ETV Bharat / entertainment

"यापेक्षा भारी मालिका नाही", म्हणत प्रेक्षकांनी दिली 'पंचायत ३' ला पसंती - Panchayat 3 - PANCHAYAT 3

Panchayat 3 X Review : 'पंचायत ३' ही लेटेस्ट रिलीज झालेली वेब सिरीज प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. मालिका पाहिल्यानंतर प्रेक्षक काय म्हणताहेत हे जाणून घेण्यासाठी बातमी वाचा.

audience reviews of Panchayat 3
'पंचायत ३' पाहून प्रेक्षकांनी केलेलं समीक्षण (IANS)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 28, 2024, 5:13 PM IST

मुंबई - Panchayat 3 X Review : व्हायरल फीव्हर (TVF) ने आज 28 मे रोजी अमेझॉन प्राईमवर आपल्या 'पंचायत' या लोकप्रिय मालिकाचा बहुप्रतिक्षित तिसरा सीझन प्रसारित केला आहे. शेवटचा सीझन येऊन जवळपास दोन वर्षे झाली होती. तेव्हापासून या मालिकेच्या नव्या सीझनची प्रतीक्षा सुरू होती. आता ही मालिका प्रसारित झाली असून प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या पात्रांच्या जगात परत जायाला मिळालंय. विस्मयकारक नव्या कथेसह नवीन सीझन पहिल्याप्रमाणेच आकर्षक असल्याचं प्रेक्षकांना वाटतंय.

समीक्षक आणि चाहत्यांकडून या शोला खूप प्रेम आणि प्रशंसा मिळत आहे. TVF नं तयार केलेली ही नवी सामुग्री प्रेक्षकांचं उत्तम मनोरंजन करत असल्याचं दिसतंय.

पंचायतीचा सीझन 3 रिलीज झाल्यानं वेब मालिकेच्या क्षेत्रात एक नवी लाट निर्माण झाली आहे. देशा विदेशातील तमाम प्रेक्षकांची ही एक खूप आवडती OTT मालिका आहे.

प्रधान जी, मंजू देवी, सचिव जी, प्रल्हाद, विकास, बनारकस, रिंकी आणि बिनोद यांसारख्या पात्रांचा शोमध्ये पूर्ण सहभाग आहे, त्यामुळे संपूर्ण शोमध्ये भरपूर मनोरंजन होत आहे. शोला सकारात्मक समीक्षने मिळत आहेत आणि फाईव्ह स्टार रेटिंग अनेकांनी दिली आहेत.

हा शो आल्यापासून लोकांना ऑनलाइनचे वेड लागल्याचं दिसत आहे. चाहत्यांना त्याची कथा, त्यातील मजेदार भाग आणि भावनांनी भरलेले भाग आवडले आहेत. सर्व चाहते याला TVF ने बनवलेला आजवरचा एक उत्कृष्ट शो असल्याचं म्हणत आहेत.

काही दिवसापूर्वी या मालिकेचा ट्रेलर रिलीज झाला होता. यामध्ये पंचायत सचिव जितेंद्र कुमार पुन्हा परतला असून त्यानं फुलेरा येथे सचिव म्हणून मुक्काम वाढवण्याचात्यानं निर्णय घेतला आहे. हा ट्रेलर पीएमच्या नवीन योजनेभोवती सुरू होतो यामुळे गावात वैर निर्माण होताना दिसते. ही मालिका पाहताना असे ऐनवेळी उद्भवणारे कठिण प्रसंग सचिव म्हणून तो कसा हाताळतो हे पाहणे मनोरंजक असेल. चंदन कुमार लिखित आणि TVF निर्मित हलकीफुलकी मनोरंजन मालिका दीपक कुमार मिश्रा यांनी दिग्दर्शित केली आहे. जितेंद्र, नीना गुप्ता आणि रघुबीर व्यतिरिक्त, फैसल मलिक, चंदन रॉय आणि सान्विका मुख्य भूमिकेत आहेत. पंचायत सीझन 3 भारतात तसेच जगभरातील 240 पेक्षा जास्त इतर राष्ट्रे आणि प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर ही मालिका झळकली आहे.

हेही वाचा -

सलमान खानच्या 'सिकंदर'मध्ये 'कटप्पा'ची एन्ट्री, खलनायक बनून देणार 'भाईजान'शी टक्कर - Salman Khans Sikandar

'पुष्पा 2' मधील 'अंगारों' गाण्याचे काऊंट डाऊन सुरू, अल्लू अर्जुनच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला - Pushpa 2

ऑस्कर विजेता रेसुल पुकुट्टी यांनी केली पायल कपाडियाविरुद्धचा खटला मागं घेण्याची मागणी - Oscar winner Resul Pukutty

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.