ETV Bharat / entertainment

रश्मिकानं पहाटे 1 वाजता उचललं 100 किलो वजन, 'कुबेरा'च्या शूटिंगमुळे झोप उडाल्याचा केला खुलासा - Rashmika Mandanna - RASHMIKA MANDANNA

रश्मिका मंदान्ना धनुष सहकलाकार असलेल्या 'कुबेरा' या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये गुंतली आहे. शेखर कमुला दिग्दर्शित 'कुबेरा' चित्रपटासाठी ती सध्या नाईट शिफ्टमध्ये काम करतेय. त्यामुळे तिचं झोपेचं, जेवणाचं, व्यायामाचं वेळापत्रक बिघडल्याचं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

Rashmika Mandanna
रश्मिका मंदान्ना
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 30, 2024, 12:49 PM IST

मुंबई - अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या साऊथ सुपरस्टार धनुषबरोबर तिच्या आगामी 'कुबेरा' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये गुंतलेली आहे. रश्मिका नेहमी आपल्या खासगी आयुष्याबद्दलच्या गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अनेकवेळा ती सोशल मीडियावर 'डियर डायरी' एंट्रीमध्ये तिचा विचार शेअर शेअर करत असते. यावेळी तिनं 'फिदा' आणि 'लव्ह स्टोरी' सारख्या चित्रपटामुळे कौतुक झालेला शेखर कमुला दिग्दर्शित 'कुबेरा' चित्रपटाच्या नाईट शिफ्टबद्दलचे एक अपडेट शेअर केले आहे.

तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर रश्मिकाने जिममधील व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडीओसह लिहिलेल्या एका नोटमध्ये तिनं सततच्या नाईट शिफ्टमुळे कंटाळा आल्याचा उल्लेख केला आहे. तिनं आपलं रोजचं वेळापत्रकच चाहत्यांसाठी दिलंय. ती सकाळी 8 वाजता 'कुबेरा'च्या शूटिंगहून परत येते, जेवण करुन दुपारी झोपण्यापूर्वी पुस्तकाचं वाचन करते. ती संध्याकाळी 6 वाजता झोपून उठते, व्यायाम करण्याची इच्छा असूनही तिचा आज मूड झाला नाही. अखेर तिनं रात्री 1 वाजता वजन उचलण्याचा निर्णय घेतला. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती 100 किलो वजन वेटलिफ्टिंग करताना दिसत आहे.

'कुबेरा' चित्रपटाचं काम करताना तिच्या अनुभवावर विचार करताना, रश्मिकाने तिचा आनंद व्यक्त केला. विशेषत: धनुष, शेखर आणि उर्वरित टीमबरोबर असलेल्या चांगल्या संबंधाबद्दलही तिनं चाहत्यांना सांगितलं. "धनुष सर आणि शेखर सर आणि निकेत आणि टीम कुबेरासोबत शूटिंग करणे खूप मजेदार आहे," असं रश्मिकानं म्हटलंय. 30 तारखेच्या पहाटेची वेळ असूनही, नाईट शिफ्टमुळे तिचे झोपेचे चक्र बिघडत असल्याचंही रश्मिकानं लिहिलंय.

रश्मिका आणि धनुष यांच्या शिवाय 'कुबेरा' चित्रपटात नागार्जुन आणि जिम सर्भ यांचाही समावेश आहे. हा चित्रपट सोनाली नारंग यांनी सादर केला आहे आणि सुनील नारंग आणि पुस्कुर राम मोहन राव यांनी त्यांच्या श्री वेंकटेश्वर सिनेमा LLP बॅनरखाली निर्मिती सुरू ठेवली आहे.

रश्मिकाच्या आगामी चित्रपटामध्ये 'पुष्पा 2: द रुल', 'इंद्रधनुष्य', 'द गर्लफ्रेंड' आणि 'छावा' यांचा समावेश आहे.

हेही वाचा -

  1. भारतीय चित्रपटांचे जनक दादासाहेब फाळके यांची आज जयंती, 'अशी' केली होती देशातील पहिल्या चित्रपटाची निर्मिती - DADASAHEB PHALKEB BIRTH ANNIVERSARY
  2. प्रभासच्या 'कल्की 2898 एडी'ची तुलना 'ड्युन'शी करणाऱ्यांना नाग अश्विनने दिलं उत्तर - Kalki 2898 AD
  3. राकेश रोशनचा वयाच्या 74 व्या वर्षीही फिटनेस उत्साह पाहून तुम्हीही व्हाल चकित - Rakesh Rsohan Fitness

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.