मुंबई : अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि अभिनेता विजय देवरकोंडा हे बऱ्याच दिवसांपासून डेटिंग करत असल्याच्या चर्चेत आहेत. या दोन्ही स्टार्सनी सोशल मीडियावर वेळोवेळी त्यांच्या कथित नात्याबद्दल संकेत दिले आहेत. अनेकदा रश्मिका आणि विजय सुट्टींवर एकत्र दिसतात. या जोडप्यानं कधीही आपल्या नात्याबद्दल चाहत्यांशी शेअर केलेलं नाही. दरम्यान, रश्मिका मंदान्ना पुन्हा एकदा तिच्या कथित बॉयफ्रेंडबरोबर नवीन वर्ष साजरे करण्यासाठी बाहेर जात असल्याचं समजत आहे. रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा विमानतळावर एकत्र स्पॉट झाले आहेत.
रश्मिका आणि विजय करणार नवीन वर्ष एकत्र साजरे : विमानताळावर रश्मिका ब्लॅक टी-शर्ट आणि डेनिम जीन्समध्ये स्पॉट झाली. यावेळी तिनं तिच्या चेहऱ्यावर काळ्या रंगाचे माक्स घातला होता. रश्मिकाची स्टाईल आता अनेकांना आवडली आहे. दुसरीकडे विजय देवरकोंडा देखील विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी तो कूल लूकमध्ये खूप सुंदर दिसत होता. विजयनं राखाडी कार्गो पँटवर हिरवे जॅकेट घातले होते. सोशल मीडियावर त्याचा सुंदर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याशिवाय या जोडप्याच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर देखील चर्चा मोठ्या झपाट्यानं सुरू आहेत.
रश्मिका आणि विजय एकत्र विमातळावर दिसले : रश्मिका मंदान्ना आणि विजय अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत, परंतु त्यांनी त्यांच्या नात्याची पुष्टी आतापर्यंत केली नाही. रश्मिका आणि विजय यांनी एकत्र 'कॉम्रेड' आणि 'गीता-गोविंदम' सारखे हिट चित्रपट दिले आहेत. आजकाल रश्मिका 'पुष्पा 2'च्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटानं जगभरात 1600 कोटी रुपये आणि भारतात 700 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान विजय शेवटी 'द फॅमिली स्टार' या चित्रपटात दिसला होता. याशिवाय चालू वर्षात तो प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी' चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसला होता. तसेच रश्मिकाबद्दल बोलायचं झालं तर पुढं ती सलमान खानबरोबर 'सिकंदर' चित्रपटामध्ये दिसणार आहे. याशिवाय ती 'छावा', 'द गर्लफ्रेंड', 'कुबेर', 'थामा', 'अॅनिमल 2' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :