ETV Bharat / entertainment

रणदीप हुड्डा स्टारर 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ - स्वातंत्र्य वीर सावरकर

Swatantrya Veer Savarkar trailer out : अभिनेता रणदीप हुडा अभिनीत मोस्ट अवेटेड चित्रपट 'स्वातंत्र्य वीर सावरकर'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होईल.

Swatantrya Veer Savarkar trailer out
स्वातंत्र्य वीर सावरकरचा ट्रेलर प्रदर्शित
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 5, 2024, 10:07 AM IST

मुंबई - Swatantrya Veer Savarkar trailer out : रणदीप हुड्डा स्टारर 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपट विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील भारतातील सर्वात प्रभावशाली आणि वादग्रस्त व्यक्तिमत्त्वांपैकी एक वीर सावरकर यांनी भारताला इंग्रजमुक्त करण्यासाठी खूप परिश्रम घेतले. दरम्यान 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाचा ट्रेलर हा 4 मार्च रोजी रिलीज झाला आहे. हा ट्रेलर आता अनेकांना पसंत पडला आहे. ट्रेलर पोस्टवर अनेकजण सध्या आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. या चित्रपटासाठी रणदीप हुड्डाला चाहते शुभेच्छा देत आहेत.

इतिहास पुन्हा लिहिला जाईल : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम अकाऊंटवर ट्रेलर शेअर करताना रणदीप हुड्डानं कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'ब्रिटिशांनी त्याला सर्वात धोकादायक माणूस म्हटलं! भारतीय क्रांतिकारकांनी त्यांना 'वीर' म्हणून आदर दिला! तरीही, तो अज्ञात राहिला. 22 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये इतिहास पुन्हा लिहिला जाईल!'' याशिवाय रणदीपनं हॅशटॅगसह पुढं लिहिलं की, ''स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या जीवनातील अनकथित गाथेचे आणि भारतीय सशस्त्र क्रांतीचे साक्षीदार व्हा.'' रणदीपचा अनोखा अंदाज पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे, त्यामुळे अनेकजण या चित्रपटाची वाट पाहत आहेत.

रणदीप हुड्डा पुन्हा वर्चस्व गाजवत आहे : या बायोपिक चित्रपटात स्वातंत्र वीर सावरकर यांचा प्रवास आणि संघर्ष दाखविण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक क्षण दाखवण्यात आले आहेत. याशिवाय पुढं दोन प्रभावी नेते महात्मा गांधी आणि वीर सावरकर यांची भेट होताना दिसत आहे. तसेच बाळ गंगाधर टिळक, मदनलाल धिंग्रा, भगतसिंग आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारख्या नेत्यांची आणि हुतात्म्यांची झलकही यात दाखवण्यात आली आहे. 'स्वातंत्र वीर सावरकर' हा चित्रपट रंजक बनवला आहे. झी स्टुडिओज, आनंद पंडित, संदीप सिंग, रणदीप हुडा आणि योगेश राहर निर्मित आणि रुपा पंडित, सॅम खान, अन्वर अली, पांचाली चक्रवर्ती यांच्या सह-निर्मित या चित्रपटात रणदीप हुडा, अंकिता लोखंडे आणि अमित सियाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. नाडियादवाला ग्रँडसनच्या वर्दा नाडियादवालाशी तेजस्विनी पंडितची मराठी चित्रपटासाठी हातमिळवणी
  2. जान्हवी कपूरचा 'ओजी मिस्टर अँड मिसेस माही'सह फोटो व्हायरल
  3. शेजारी देशांशी असलेल्या भारताच्या संबंधाबद्दल जयशंकर यांच्या भूमिकेचं अमिताभ बच्चन यांनी केलं कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.