ETV Bharat / entertainment

'लव्ह अँड वॉर'मध्ये आजवर कधीही न दिसलेल्या अवतारात दिसणार रणबीर कपूर - लव्ह अँड वॉर

Ranbir Kapoor Role in Love and War :अभिनेता रणबीर कपूर 'लव्ह अँड वॉर' चित्रपटात पत्नी आलिया भट्टबरोबर दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करणार आहे.

Ranbir Kapoor Role in Love and War
लव्ह अँड वॉरमध्ये रणबीर कपूरची भूमिका
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 6, 2024, 4:52 PM IST

मुंबई - Ranbir Kapoor Role in Love and War : 'ॲनिमल' स्टार रणबीर कपूर आता त्याच्या आगामी 'लव्ह अँड वॉर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'लव्ह अँड वॉर'चे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करणार आहेत. अलीकडेच या चित्रपटामधील संजय यांनी 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात रणबीरसोबत पत्नी आलिया भट्ट आणि विकी कौशलबरोबर दिसणार आहेत. दरम्यान आलिया भट्टनं 24 जानेवारीला चित्रपटाची पोस्ट शेअर करून चित्रपटाविषयी माहिती दिली होती. या चित्रपटामध्ये रणबीरची भूमिका जोरदार असल्याचं म्हटलं जात आहे. 'लव्ह अँड वॉर' लव्ह ट्रँगल दाखविण्यात येणार आहे.

रणबीर आणि संजय 17 वर्षांनंतर एकत्र काम करणार : 'लव्ह अँड वॉर' चित्रपटातील रणबीर कपूरची भूमिका समोर आली आहे. 'ॲनिमल' पाहिल्यानंतर आता रणबीर कपूरचा चाहतावर्ग वाढला आहे. तो या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. रणबीर आणि संजय लीला भन्साळी 17 वर्षांनंतर एकत्र काम करत आहेत. रणबीरनं संजयच्या 'सावरिया' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होत. मात्र, रणबीरचा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला. दरम्यान संजय त्यांच्या लव्ह ट्रँगल ॲक्शन लव्हस्टोरी चित्रपटात रणबीरची भूमिका खूप दमदार आणि मजबूत करण्यात व्यग्र आहे. संजय लीला भन्साळीच्या 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटासाठी प्रेक्षकांना बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. हा चित्रपट 2025 च्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

रणबीर आणि आलियाचं वर्कफ्रंट : रणबीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याचा 'ॲनिमल' नुकताच हिट झाला आहे. आता पुढं तो 'रामायणा पार्ट 1', 'ब्रह्मास्त्र पार्ट 2' आणि 'ब्रह्मास्त्र पार्ट 3'मध्ये दिसणार आहेत. दुसरीकडे आलिया शेवटची 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये दिसली होती. आता पुढं ती 'जिगरा' आणि 'तख्त'मध्ये दिसेल. याशिवाय 'इन्शाअल्लाह'मध्ये ती सलमान खानसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करणार आहे. सध्या आलियाच्या चित्रपटाबद्दल जोरदार चर्चा सुरू आहेत.

हेही वाचा :

  1. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचा बेल्जियममध्ये शॉपिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल
  2. 'फाइटर' में एयरफोर्स यूनिफॉर्म में ऋतिक-दीपिका को किस करना पड़ा भारी, मिला लीगल नोटिस
  3. 'लव्ह स्टोरीयाँ': करण जोहरने बनवली व्हॅलेंटाईन डेसाठी सहा भागांची मालिका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.