ETV Bharat / entertainment

रणबीर कपूरचे नवीन हेअरकटमधील फोटो व्हायरल, चाहत्यांनी लावला 'धूम 4'चा अंदाज... - RANBIR KAPOOR DHOOM 4 LOOK

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या डॅशिंग लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्याला पाहून चाहते अनेक अंदाज बांधत की, 'धूम 4'ची तयारी सुरू आहे.

Ranbir Kapoor
रणबीर कपूर (रणबीर कपूर (IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 15, 2024, 5:24 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरनं नवीन हेअरकटनं सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट अलीम हकीमनं इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यात रणबीर खूपच देखणा दिसत आहे. व्हायरल झालेल्या फोटोत, रणबीर कपूर सनग्लास लावून स्टाइलिश दिसत आहे. लहान, स्लीक हेअरस्टाइलसह रणबीर हा पहिल्या फोटोत पोझ देताना दिसत आहे. दुसऱ्या एका फोटोत रणबीर हा क्लोज-अप शॉटमध्ये दमदार दिसत आहे. तिसऱ्या फोटोत तो अलीम हकीमबरोबर मिरर सेल्फीमध्ये दिसत आहे. रणबीरचा हा नवीन अंदाज त्याच्या चाहत्यांना खूप पसंत पडला आहे.

'धूम 4'ची तयारी सुरू : दरम्यान हेअरस्टाइलिस्टनं या पोस्टमध्ये रणबीरचं कौतुक करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. त्यानं पोस्टमच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'हॉटनेस अलर्ट, रणबीर कपूर.' अलीम हकीमनं हा फोटो शेअर करताच चाहत्यांनी कमेंट विभागात कौतुकाचा वर्षाव केला आहे. रणबीरला धूम फ्रँचायझीशी जोडण्यापासून बरेच लोक स्वतःला रोखू शकले नाहीत. असा अंदाज लावल्या जात आहे की, आगामी चित्रपट 'धूम 4'मध्ये रणबीर असू शकतो. दरम्यान एका यूजरनं या पोस्टवर लिहिलं, 'कदाचित हे 'धूम 4'साठी आहे.' दुसऱ्यानं एकानं लिहिलं, 'मला वाटते की, ' धूम 4'ची तयारी सुरू झाली आहे.' याशिवाय आणखी एकानं लिहिलं, 'रणबीरचा हा लूक खूप सुंदर आहे.'

रणबीर कपूरचं वर्क फ्रंट : धूम फ्रँचायझी त्याच्या मनोरंजक कहाणी आणि स्टार-स्टडेड कास्टसाठी ओळखली जाते. 2004 मध्ये आलेल्या पहिल्या चित्रपटापासून ही फ्रेंचाइजी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. संजय गढवी दिग्दर्शित या फ्रँचायझीची सुरुवात अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिकेत झाली होती. यानंतर 'धूम'च्या सीक्वलमध्ये हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय दिसले. याशिवाय 'धूम 3'मध्ये आमिर खान आणि कतरिना कैफ यासारखे स्टार्स एकत्र दिसले. रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूर 'धूम 4'चा भाग असू शकतो, मात्र याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान रणबीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, रणबीरचा रिलीज झालेला 'ॲनिमल' हा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर झाला होता. आता पुढं तो नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्ये दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे संजय लीला भन्साळी यांचा 'लव्ह अँड वॉर' हा चित्रपट देखील आहे.

हेही वाचा :

  1. रणबीर कपूरनं पुन्हा आणली वरात, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
  2. राहानंतर आलिया भट्ट करतेय दुसऱ्या बाळाची अपेक्षा, भविष्यातील योजनांबद्दल केला खुलासा
  3. 'धूम 4'ला मिळाला नवा दिग्दर्शक, रणबीर कपूरबरोबर जमणार पुन्हा जोडी - Dhoom 4 update

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.