ETV Bharat / entertainment

राम मंदिर उद्घाटन सोहळा संपन्न, सोनू आणि शंकर यांनी गायली भजन - सोनू निगम

Ram Mandir Pran Pritishtha Ceremony begins : राम मंदिर उद्घाटन सोहळा हा जल्लोषानं साजरा केला आहे. या विशेष प्रसंगी सोनू निगम आणि शंकर महादेवननं सुंदर भजन गायली आहेत.

Ram Mandir Pran Pritishtha Ceremony begins
राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला सुरुवात
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 22, 2024, 2:36 PM IST

मुंबई - Ram Mandir Pran Pritishtha Ceremony begins : अगणित रामभक्तांच्या अस्मितेशी जोडला गेलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठीची प्रतिक्षा अखेर आज संपली. या सोहळ्यामध्ये अनेक स्टार्स आवर्जून उपस्थित राहिले. या कार्यक्रमादरम्यान सर्वत्र अक्षरशः रामनामाचा जयजयकार दुमदुमत होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 22 जानेवारी रोजी नियोजित वेळेनुसार श्रीराम अभिषेक कार्यक्रमाला सुरुवात केली. दरम्यान पार्श्वगायक सोनू निगम आणि शंकर महादेवन यांच्या आवाजात राम भजन उपस्थितांना मोहवत होतं. या कार्यक्रमात देश-विदेशातील अनेक नामवंतांनी सहभाग घेतला. या सोहळ्याला रणबीर कपूर, आलिया भट्ट, विकी कौशल, कतरिना कैफ, आयुष्मान खुराना, कंगना राणौत, दिग्दर्शक मधुर भांडारकर, अनुपम खेर, विवेक ओबेरॉय यांच्यासह अनेक बॉलिवूड स्टार्स राम नामाचा जयजयकार करत होते.

सोनू निगम आणि शंकर महादेवन यांनी गायलं भजन : थलैवा रजनीकांत, मेगास्टार चिरंजीवी आणि राम चरणसह साऊथ सिनेसृष्टीतील अनेक स्टार्स येथे पोहोचले होते. त्याचबरोबर आता सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये स्टार्स आणि भक्त जय श्रीरामाच्या घोषणा देत आहेत. गायक-संगीतकार शंकर महादेवन यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी अयोध्येतील श्रीराम मंदिरात राम भजन गायले. याशिवाय गायक सोनू निगमनं देखील यावेळी श्रीराम मंदिरात भजन गायले होते. भजन गात असतानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये तिथे सर्व उपस्थित असलेले मान्यवर श्रीराम भक्तीत तल्लीन दिसत आहेत.

अंबानी कुटुंबीयांनी नोंदवली उपस्थिती : अयोध्येतील श्रीराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत हे देखील प्रार्थना करताना दिसले. त्याचबरोबर मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी, मुलगा आकाश अंबानी, मुलगी ईशा अंबानीसोबत या कार्यक्रमात पोहोचले होते. ईशाचे सासू-सासरेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. 22 जानेवारीला होणार हा कार्यक्रम सर्वच श्रीराम भक्तांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिवसाची अनेकजण वाट पाहात होते. हा कार्यक्रम जल्लोषात साजरा केला जात आहे. अयोध्येत आज श्रीराम भक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

हेही वाचा :

  1. 'बडे मियाँ छोटे मियाँ' स्टार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफनं श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी चाहत्यांना दिल्या शुभेच्छा
  2. 'शराबी' या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार अभिषेक कपूर, केली घोषणा
  3. राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी 'हे' सेलिब्रिटी झाले रवाना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.