ETV Bharat / entertainment

राजकुमार राव अभिनीत 'श्रीकांत' केली पहिल्या दिवशी धमाकेदार कमाई - rajkummar rao - RAJKUMMAR RAO

Srikant : राजकुमार रावचा 'श्रीकांत' चित्रपटामधील अभिनय प्रेक्षकांना खूप आवडत आहे. आता या चित्रपटानं पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

Srikant
श्रीकांत (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 11, 2024, 10:18 AM IST

मुंबई - Srikant : अभिनेता राजकुमार राव स्टारर 'श्रीकांत' हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. आता हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात राजकुमार राव देशातील लोकप्रिय उद्योगपती श्रीकांत बोल्ला यांच्या भूमिकेत दिसत आहे. शारीरिक अंधत्वावर मात करत आपल्या दूरदृष्टीने व्यावसायिक यशाचा नवा अध्याय रचणारे उद्योजक अशी श्रीकांत बोल्ला यांची ओळख आहे. त्यांचा बायोपिक असलेल्या 'श्रीकांत' चित्रपटातला राजकुमार रावचा शीर्षक भूमिकेतला अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 'श्रीकांत'चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट खूप चर्चेत होता. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 10 मे रोजी रिलीज झाला. आता या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनही समोर आलं आहे. 'श्रीकांत'नं पहिल्या दिवशी किती कमाई केली, याबद्दल जाणून घेऊ या...

'श्रीकांत' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'श्रीकांत' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 2.25 कोटीची कमाई केली आहे. हा चित्रपट 40 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केलंय. 'श्रीकांत' चित्रपटाला दुसऱ्या दिवशी वीकेंडला फायदा मिळू शकतो. या आठवड्यात श्रीकांत व्यतिरिक्त कोणताही मोठा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला नाही, त्यामुळे आगामी काळात हा चित्रपट अधिक चांगली कामगिरी करू शकेल, अशी अपेक्षा केली जात आहे. श्रीकांत बोल्ला यांच्या बायोपिक'मध्ये साऊथ अभिनेत्री ज्योतिका ही मुख्य भूमिकेत आहे. ज्योतिका नुकतीच अजय देवगणच्या सुपरनॅचरल हॉरर थ्रिलर 'शैतान'मध्ये दिसली होती.

राजकुमार रावचं वर्कफ्रंट : याव्यतिरिक्त आलिया एफ आणि शरद केळकर हे कलाकारही या चित्रपटात दिसले आहेत. भूषण कुमार, कृष्ण कुमार, निधी परमार हिरानंदानी 'श्रीकांत'चे निर्माते आहेत. दरम्यान राजकुमार रावच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'मिस्टर एंड मिसेज माही' या चित्रपटामध्ये जान्हवी कपूरबरोबर दिसणार आहे. तसेच तो 'स्त्री 2' या चित्रपटामध्ये श्रद्धा कपूरबरोबर रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करताना लवकरच दिसणार आहे. याशिवाय तो 'विक्की विद्या का वो वाला व्हिडियो' या चित्रपटामध्ये तृप्ती डिमरीबरोबर स्क्रिन शेअर करताना दिसेल. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर करत आहे. सध्या हा चित्रपट खूप चर्चेत आहे.

हेही वाचा :

  1. 'बडे मियाँ छोटे मियाँ' जगभरात पाचव्या दिवशी करणार 100 कोटींचा टप्पा पार - bade miyan chote miyan
  2. विजय देवेरकोंडा आणि मृणाल ठाकूर स्टारर 'द फॅमिली स्टार'च्या कमाईत घसरण... - the family star Movie
  3. 'शैतान'ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई; निर्मात्यांनी शेअर केली पोस्ट - ajay devgan shaitaan

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.