ETV Bharat / entertainment

राजकुमार राव बनला 'मालिक', आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक आणि शीर्षक प्रदर्शित - rajkummar rao first look - RAJKUMMAR RAO FIRST LOOK

Maalik Movie: राजकुमार रावच्या आगमी चित्रपटाचं शीर्षक आणि फर्स्ट लूक समोर आला आहे. यामध्ये तो अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत आहे.

Maalik Movie
मालिक चित्रपट (राजकुमार राव (Movie Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Aug 31, 2024, 3:56 PM IST

मुंबई - Maalik Movie : 'स्त्री 2' फेम अभिनेता राजकुमार रावनं चाहत्यांना त्याच्या वाढदिवसानिमित्त एक भेट दिली आहे. राजकुमार आज 31 ऑगस्ट रोजी 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष प्रसंगी त्यानं त्याच्या आगामी चित्रपटाचं शीर्षकासह एक पोस्टर शेअर केलं आहे. राजकुमारनं त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव आणि फर्स्ट लूक शेअर करून सोशल मीडियावर धमाका केला आहे. राजकुमार राव स्टारर या चित्रपटाचं नाव 'मालिक' आहे. आजपासून या चित्रपटाचं शूटिंग सुरू झाल्याचेही सांगितलं जात आहे. या चित्रपटामध्ये राजकुमार हा अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे.

राजकुमार रावनं चित्रीकरण केलं सुरू : फर्स्ट लूक पोस्टरमध्ये राजकुमारच्या हातात बंदूक असून तो जीपवर उभा आहे. त्याचा हा ॲक्शन लूक, त्याच्या चाहत्यांना देखील खूप आवडत आहे. या चित्रपटाचं फर्स्ट लूक आणि शीर्षक उघड करताना राजकुमारनं त्याच्या पोस्टवर लिहिलं, "मालिकच्या जगात आपलं स्वागत आहे, शूटिंग सुरू झाले आहे, लवकरच भेटू." पोस्टरबद्दल बोलायचं झालं तर यात एक टॅग लाइन आहे, यात लिहिलंय, 'मालिक - पैदा नहीं हुए तो क्या बन तो सकते है' राजकुमारनं शेअर केलेल्या फोटोवर अनेकजण कमेंट्स करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. याशिवाय काहीजण हा चित्रपट कधी रिलीज होईल याबद्दल विचारत आहेत.

'मालिक' चित्रपटाबद्दल : 'मालिक' चित्रपटाची निर्मिती टिप्स फिल्म प्रॉडक्शन कुमार तौरानी आणि जय सेवकरमानी हे करत आहेत. दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन पुलकित करणार आहे. दरम्यान राजकुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तो सध्या त्याच्या हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री 2'च्या यशाचा आनंद घेत आहे. 'स्त्री 2' चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 450 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटानं जगभरात 600 कोटीहून अधिक कमाई केली आहे. आज, 31 ऑगस्ट रोजी, 'स्त्री 2' हा रिलीजच्या 17व्या दिवसात आहे. हा चित्रपट आतादेखील बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करताना दिसत आहे.

हेही वाचा :

  1. राजकुमार रावनं मेहनतीच्या जोरावर जिंकलं 'स्वप्न', कठीण परिस्थितीवर केली मात - rajkummars top 5 movies
  2. श्रद्धा कपूर स्टारर 'स्त्री 2'नं 12 दिवसात जगभरात 500 कोटीची केली 'कमाई' - STREE 2close to 600 cr at worldwide
  3. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2'नं केला धमाका, 400 कोटीचा टप्पा पार - Stree 2

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.