मुंबई - Rajinikanth Kalki 2898 AD : अभिनेता प्रभास स्टारर चित्रपट 'कल्की 2898 एडी' जगभरात बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कलेक्शन करत आहे. प्रभासचे चाहते आणि चित्रपट समीक्षक 'कल्की 2898'च्या रिलीजची वाट आतुरतेनं पाहत होते. 'कल्की 2898 एडी' 27 जून रोजी रिलीज झाला असून या चित्रपटाचा क्रेझ चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. 'कल्की 2898 एडी'ला प्रेक्षक आणि चित्रपट समीक्षक चांगला प्रतिसाद देत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक सुपरस्टार्सनीही आपल्या प्रतिक्रिया आता सोशल मीडियाद्वारे देऊन, या चित्रपटामधील स्टार कास्टचं कौतुक केलंय.
Watched Kalki. WOW! What an epic movie! Director @nagashwin7 has taken Indian Cinema to a different level. Hearty congratulations to my dear friend @AswiniDutt @SrBachchan @PrabhasRaju @ikamalhaasan @deepikapadukone and the team of #Kalki2898AD. Eagerly awaiting Part2.God Bless.
— Rajinikanth (@rajinikanth) June 29, 2024
रजनीकांतनं केलं 'कल्की 2898 एडी'चं कौतुक : सध्या 'कल्की 2898 एडी'ची स्तुती चौफेर होत आहे. दरम्यान साऊथ सुपरस्टार रजनीकांतनं देखील आपली प्रतिक्रिया या चित्रटाबाबत दिली आहे. 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट पाहिल्यानंतर रजनीकांतनं एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर करत लिहिलं, "मी 'कल्की 2898 एडी' पाहिला आहे, हा चित्रपट खूप छान आहे. नाग अश्विननं भारतीय सिनेमाला एका वेगळ्या पातळीवर नेले आहे, माझा प्रिय मित्र अश्विनी दत्त, अमिताभ बच्चन, प्रभास, कमल हासन, दीपिका पदुकोण आणि कल्कीची संपूर्ण टीम यांचे हार्दिक अभिनंदन. मी चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहे. गॉड ब्लेस यू." आता या पोस्टवर अनेक चाहते, या चित्रपटाबद्दल कौतुक करताना दिसत आहेत.
'कल्की 2898 एडी' चित्रपटाबद्दल : 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट 600 कोटीच्या बजेटमध्ये निर्मित करण्यात आला आहे. आतापर्यंत या चित्रपटानं देशांतर्गत एकूण 149.3 कोटीची कमाई केली आहे. याशिवाय 'कल्की 2898 एडी'नं जगभरात 191 कोटीहून अधिकचा गल्ला जमा केला आहे. या चित्रपटाचं संगीत संतोष नारायणन यांनी दिलंय. हा चित्रपट वैजयंती मूव्हीज अंतर्गत आणि सी. आसवानी दत्त निर्मित आहे. हा चित्रपट खूप वेगानं बॉक्स ऑफिसवर कमाई करताना दिसत आहे. दरम्यान रजनीकांतच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर पुढं तो 'जेलर 2', 'कुली', आणि 'वेट्टायन' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. सध्या हे तिन्ही चित्रपट खूप चर्चेत आहेत.
हेही वाचा :
- कतरिना कैफनं पती विकी कौशल स्टारर 'बॅड न्यूज'च्या ट्रेलरवर दिली प्रतिक्रिया, झाली पोस्ट व्हायरल - KATRINA KAIF
- 'कल्की 2898 एडी'नं रिलीजच्या दुसऱ्या दिवशी केली धमाकेदार कमाई - kalki 2898 ad box office day 2
- "आशाताई गाते हे मला ठाऊक नव्हतं," मंगेशकरांनी सांगितल्या 'हृदया'जवळच्या आठवणी - Swaraswamini Asha