ETV Bharat / entertainment

ईडीने ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्यानंतर राज कुंद्राची गूढ पोस्ट - Raj Kundra - RAJ KUNDRA

अंमलबजावणी संचालनालयाने राज कुंद्रा याच्या राहत्या घरासह मालमत्तेवर जप्ती आणल्यानंतर त्यानं सोशल मीडियावर एक गूढ पोस्ट शेअर केली आहे. बिटकॉइन पॉन्झी घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या हायप्रोफाईल प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Raj Kundras  Cryptic  post
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 19, 2024, 12:05 PM IST

मुंबई - उद्योगपती राज कुंद्रा आणि त्यांची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 6600 कोटी रुपयांच्या बिटकॉइन पॉन्झी घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर राज कुंद्रा यांनी सोशल मीडियावर एक सिक्रेट पोस्ट शेअर केली आहे.

ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत (पीएमएलए) राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीचा बंगला, फ्लॅट आणि इक्विटी शेअर्ससह सुमारे 97.79 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. क्रिप्टोकरन्सी स्कीमच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची कथित फसवणूक केल्याच्या चौकशीनंतर ईडीने हे पाऊल उचलले आहे.

Raj Kundras  Cryptic  post
राज कुंद्राची गूढ पोस्ट

ईडीने केलेल्या या आरोपांदरम्यान राज कुंद्राने त्याच्या इंस्टाग्रामवर एक गूढ संदेश पोस्ट केला आहे. यात त्यानं लिहिलंय, "तुमचा अपमान होत असतानाही तुम्ही जेव्हा शांत राहाता तेव्हा तुम्ही अधिक परिपक्व होत आहात असं समजावं."

दरम्यान, त्यांचे कायदेशीर वकील प्रशांत पाटील यांनी पूर्वी सांगितलं आहे की ते त्यांचे हक्क आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचे पालन करतील. वकील पाटील यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त करत अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याची तयारी दाखवली.

व्हेरिएबल टेक प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आणि बिटकॉइन पॉन्झी घोटाळ्याशी संबंधित अनेक व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनंतर ईडीने आपली चौकशी सुरू केली आहे. या स्कीममध्ये कथितरित्या लोकांकडून महत्त्वपूर्ण निधीची फसवणूक करण्यात आली होती आणि आकर्षक परताव्याची हमी देण्यात आली होती. विशेष म्हणजे, ईडीने मुंबईतील जुहू येथील राहातं घर, पुण्यातील बंगला आणि राज कुंद्राच्या नावावरील एकूण ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जसजसे कायदेशीर कार्यवाही सुरू झाली आहे तेव्हापासून लोक या हाय-प्रोफाइल प्रकरणातील घडामोडींवर माध्यमांसह लोकांचंही लक्ष लागून राहिलं आहे.

हेही वाचा -

  1. 'अमर सिंग चमकीला'च्या शूटिंगमध्ये परिणीतीला लाईव्ह परफॉर्म करताना पाहून पती राघव चड्ढा झाला होता दंग - Parineeti Chopra
  2. मनी लाँडरिंग प्रकरणात राज कुंद्रा अडकल्यानंतर लोकांनी शिल्पाला सुनावले खडे बोल - Money Laundering Case
  3. 'पुष्पा 2'चे हिंदी वितरण हक्क 200 कोटी रुपयांना विकले गेलं, रचला नवा विक्रम - pushpa 2

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.