मुंबई - Raayan and Deadpool & Wolverine: भारतीय बॉक्स ऑफिसवर 26 जुलै रोजी दोन चित्रपटांमध्ये धडक झाली आहे. 'रायन' यामध्ये साऊथ स्टार धनुष आहे आणि दुसरा हॉलिवूड चित्रपट 'डेडपूल अॅन्ड वूल्वरिन' आहे. या दोन्ही चित्रपटांची क्रेझ प्रचंड पाहायला मिळत आहे. दोन्ही चित्रपटांनी रिलीजच्या पहिल्या दिवशी उत्कृष्ट कलेक्शन केलंय. यातील एका चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अधिक कलेक्शन केलं आहे. साऊथचा सुपरस्टार धनुष स्टारर 'रायन'नं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली आहे. धनुषच्या 'रायन'नं रिलीजच्या पहिल्याच दिवशी 10 कोटींहून अधिक कमाई केली. 'रायन' या चित्रपटापूर्वी धनुष 'कॅप्टन मिलर' चित्रपटामध्ये दिसला होता. 'रायन'बरोबर हॉलिवूडचा 'डेडपूल अॅन्ड वूल्वरिन' हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे.
'रायन' आणि 'डेडपूल अॅन्ड वूल्वरिन' चित्रपट : 'रायन' हा धनुषच्या दिग्दर्शनाखाली बनलेला दुसरा चित्रपट असून यापूर्वी 2017 मध्ये त्यानं 'पा पांडी' हा बनवला होता. सॅकनिल्कनुसार, 'रायन'नं ओपनिंगच्या दिवशी 12.50 कोटी रुपयांचे खाते उघडले आहे. रायन चित्रपटासाठी तमिळ भाषेतील चित्रपटगृहांमध्ये 58.65 टक्के ऑक्युपन्सी रेट नोंदवला गेला आहे. दुसरीकडे, रेनॉल्ड्स आणि ह्यू जॅकमॅनच्या ॲक्शन कॉमेडी चित्रपट 'डेडपूल अॅन्ड वूल्वरिन'नं भारतात पहिल्याच दिवशी 22.3 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटानं तामिळ भाषेत 1.1 कोटी रुपये, तेलुगूमध्ये 1.2 कोटी रुपये, हिंदीमध्ये 8.1 कोटी रुपये आणि इंग्रजीमध्ये सर्वाधिक 11.9 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
#Raayan debuts at No.2 jus behind #DeadpoolAndWolverine in UAE 🇦🇪, Singapore 🇸🇬 and Malaysia 🇲🇾
— Ramesh Bala (@rameshlaus) July 27, 2024
धनुषचा चित्रपट परदेशातही लोकप्रिय : 'रायन' परदेशातही चांगली कमाई करत आहे. यूएई, सिंगापूर आणि मलेशियामध्येही हा चित्रपट रिलीज झाला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी त्यांच्या एक्स हँडलवरच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "डेडपूल अॅन्ड वूल्वरिन'नंतर, यूएई, सिंगापूर आणि मलेशियामध्ये 'रायन' दुसऱ्या क्रमांकावर चित्रपट आहे." सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटाला प्रौढ श्रेणीचा यूए प्रमाणपत्र दिलंय. 'रायन'चा रनटाइम 2.25 तास आहे. धनुषबरोबर चित्रपटात एसजे सूर्या, संदीप किशन, कालिदास जयराम, अपर्णा बालमुरली, दुशरा विजयन, प्रकाश राज आणि सेल्वाराघवन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. 'रायन' चित्रपटाला संगीत ए आर रहमान यांनी दिलंय. आता येणाऱ्या काळात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल यावर अनेकांचं लक्ष आहे.