ETV Bharat / entertainment

सारा अली खान स्टारर 'ए वतन मेरे वतन' चित्रपटामधील 'कतरा कतरा' गाणं रिलीज, पाहा व्हिडिओ

Qatra Qatra Song OUT : अभिनेत्री सारा अली खान अभिनीत 'ए वतन मेरे वतन' या चित्रपटातील 'कतरा कतरा' हे पहिलं गाणं रिलीज झालं आहे. हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

Qatra Qatra Song OUT
कतरा कतरा गाणं रिलीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 3:41 PM IST

मुंबई - Qatra Qatra Song OUT : सारा अली खान स्टारर 'ए वतन मेरे वतन' चित्रपट हा सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातून सारा पहिल्यादा देशभक्तीपर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटासाठी ती खूप उत्सुक आहे. 'ए वतन मेरे वतन' हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान 'ए वतन मेरे वतन' चित्रपटातील 'कतरा कतरा' गाणं आता रिलीज करण्यात आलं आहे. हे गाणं सुखविंदर सिंग यांनी गायलं आहे. याशिवाय या गाण्याला राघव शर्मा यांनी लिहिलं आणि संगीतबद्ध केलं आहे. 'ए वतन मेरे वतन'मधील 'कतरा कतरा' ट्रॅक प्रथम गोव्यातील 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) प्रदर्शित करण्यात आलं होतं.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

सुखविंदर सिंगनं दिला लाइव्ह परफॉर्मन्स : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यावेळी सुखविंदर सिंगनं जबरदस्त लाइव्ह परफॉर्मन्स दिला होता. हा दमदार परफॉर्मन्स पाहण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक कन्नन अय्यर, मुख्य अभिनेत्री सारा अली खान आणि चित्रपटाचे निर्माते करण जोहर आणि अपूर्व मेहता देखील या कार्यक्रमात उपस्थित होते. देशभक्तीवर आधारित हे गाणं समर्पण, निष्ठा आणि आदराची भावना जागृत करते. स्वातंत्र्यासाठी लढलेल्या भारत छोडो आंदोलन (1942) दरम्यान गायब झालेल्या वीरांच्या भावना आणि समर्पणाचे सुंदरपणे सादरीकरण या गाण्यात करण्यात आलं आहे. या गाण्याबद्दल बोलताना गायक सुखविंदर सिंग सांगितलं की, ''कतरा कतरा'ला माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे, हे गाणं केवळ देशभक्ती आणि अभिमानाची भावनाच जागृत करत नाही तर आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी भावना आणि शक्ती देखील यात सामील आहे. पुढं त्यांनी म्हटलं, ''ए वतन मेरे वतन'शी जोडून मला खूप आनंद होत आहे, ही एक अनोखी कहाणी आहे जी तरुणांच्या आवाजाच्या सामर्थ्याची झलक देते.''

'ए वतन मेरे वतन' चित्रपटाची स्टारकास्ट : 'ए वतन मेरे वतन' या चित्रपटात सारा अली खान मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट करण जोहर, अपूर्व मेहता आणि सोमेन मिश्रा निर्मित असून धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत आहे. या चित्रपटाची कहाणी अय्यर आणि दरब फारुकी यांनी लिहिली आहे. इमरान हाश्मी, सचिन खेडेकर, अभय वर्मा, स्पर्श श्रीवास्तव, ॲलेक्स ओ'नील आणि आनंद तिवारी यांचा कॅमियो या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 'ए वतन मेरे वतन'चा प्रीमियर भारतात आणि जगभरातील 240 पेक्षा जास्त देशात 21 मार्च रोजी हिंदीमध्ये तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड डब्ससह प्राइम व्हिडिओवर होणार आहे.

हेही वाचा :

  1. 28 वर्षांनंतर मिस वर्ल्ड स्पर्धा भारतात ; करण जोहर ते नेहा कक्कर पर्यंत हे भारतीय सेलिब्रिटी करतील धमाका
  2. मिस वर्ल्ड २०२४ च्या मंचावर संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी'चे पहिले गाणे होणार लॉन्च
  3. 'भूल भुलैया 3'ची शूटिंग सुरू; कार्तिक आर्यन देवापुढे नतमस्तक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.