मुंबई : सुपरस्टार शाहरुख खानचा हिंदी बॉक्स ऑफिसवर ओपनिंग वीकचा 'जवान'चा रेकॉर्ड अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2 - द रुल' या ॲक्शन ड्रामानं अवघ्या 6 दिवसांत मोडला. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला असून बॉक्स ऑफिसवर तो एकामागून एक विक्रम करत आहे. 'पुष्पा 2'नं 6 दिवसात जगभरात 1000 कोटींचा टप्पा पार करून इतिहास रचला आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 175 कोटीची कमाई करत, 'आरआरआर' रेकॉर्ड मोडला होता.
'पुष्पा 2'चं कलेक्शन : दरम्यान पेड प्रीव्यूमध्ये या चित्रपटानं जवळपास 10.65 कोटी कमावले होते. सहाव्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटानं सर्व भाषांमध्ये 51.55 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह देशांतर्गत 'पुष्पा 2'नं एकूण 687 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर सातव्या दिवशी, 'पुष्पा 2'नं हिंदीत बॉक्स ऑफिसवर 400 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. एका आठवड्यात या चित्रपटाने हिंदी बॉक्स ऑफिसवर एकूण 405 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटानं सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडून जागतिक कमाईमध्ये पहिले स्थान मिळवले आहे.' पुष्पा 2' हा सर्वात जलद गतीनं 1000 कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. आता 'पुष्पा 2' प्रभासच्या सर्वकालीन ब्लॉकबस्टर 'बाहुबली 2'च्या आजीवन कलेक्शनला मागे टाकण्याच्या तयारीत आहे.
'बाहुबली 2'चा मोडणार विक्रम ? : प्रभास स्टारर 'बाहुबली 2'नं 6 आठवड्यात 1030 कोटी रुपयांचे आजीवन कलेक्शन केलं होतं. सातव्या दिवशी अल्लू अर्जुनच्या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1025 कोटींची जबरदस्त कमाई केली आहे. आता हा चित्रपट आज नक्कीच 'बाहुबली 2'चा विक्रम मोडणार अशी अपेक्षा केली जात आहे.
'पुष्पा 2'चं एकूण कलेक्शन
पेड प्रीव्यू - 10.65 कोटी
1 दिवस - 164.25 कोटी
2 दिवस - 93.8 कोटी
3 दिवस - 119.25 कोटी
4 दिवस - 141.05 कोटी
5 दिवस - 64.45 कोटी
6 दिवस - 51.55 कोटी
एकूण कलेक्शन- 645 कोटी
जगभरातील कलेक्शन - 1025
'पुष्पा 2'नं या चित्रपटांचा विक्रम तोडला
1. बाहुबली : 2- 10 दिवस
2. केजीएफ : 2- 16 दिवस
3. आरआरआर- 16 दिवस
4. जवान - 18 दिवस
5. कल्कि 2898 एडी - 25 दिवस
6. पठाण- 27 दिवस
7. दंगल - 154 दिवस
हेही वाचा :