मुंबई - दक्षिणात्य चित्रपटाचा सुपरस्टार अल्लू अर्जुननं पहिल्याच दिवशी त्याच्या 'पुष्पा 2' चित्रपटाच्या कमाईनं बॉक्स ऑफिसवर यशाचा झेंडा उभा केला आहे. सुमारे 350 कोटी रुपयांचे बजेट असलेल्या 'पुष्पा 2' नं पहिल्या दिवसाच्या कलेक्शनमधूनच 90 टक्के बजेट कव्हर केलं आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांची जोडी प्रेक्षकांचं खूप मनोरंजन करत आहे. या चित्रपटानं पहिल्या दिवशी जगभरातील बॉक्स ऑफिसवर 294 कोटींचा व्यवसाय केला आहे. त्याचबरोबर 'पुष्पा 2' चित्रपटानं भारताच्या हिंदी पट्ट्यात पहिल्याच दिवशी 72 कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी किती कलेक्शन केले आणि एकूण कलेक्शन किती झाले ते जाणून घेऊया.
पुष्पा 2 ची भारतात 250 कोटींहून अधिक कमाई
पुष्पा 2 : द रुल या चित्रपटानं भारतातील सर्व भाषांमध्ये 174.9 कोटी रुपयांचं खाते उघडलं आहे. तर दुसऱ्या दिवशी पुष्पानं भारतात 90.10 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं आहे. SACNL च्या अहवालानुसार, दोन दिवसात भारतातील पुष्पाच्या निव्वळ कलेक्शननं 250 कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे. भारतातल्या बॉक्स ऑफिसवर पुष्पा 2 चं एकूण निव्वळ कलेक्शन 265 कोटी रुपये झालं आहे. याशिवाय चित्रपटानं दोन दिवसांत जगभरात 400 कोटींचा आकडा पार केला आहे. दुसऱ्या दिवसाच्या कमाईसह पुष्पा 2 नं शाहरुख खानच्या जवान या चित्रपटासह सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. जवानानं दुसऱ्या दिवशी भारतात 70 कोटींहून अधिक कमाई केली होती.
सर्व भारतीय चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत निघाले
पुष्पा 2 नं राम चरण आणि ज्युनियर एनटीआर आरआरआर चित्रपटाच्या ओपनिंग डे कलेक्शनचा 225 कोटी रुपयांचा विक्रम मोडला आहे. पुष्पा भारतीय आणि दक्षिणात्य सिनेमातील सर्वात मोठं ओपनिंग देणारा चित्रपट बनला आहे आणि यामुळं अल्लू अर्जुनच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सलामीवीर बनला आहे. पुष्पा 2 चित्रपटानं भारतीय चित्रपट उद्योगातील सर्व मोठ्या ओपनिंग चित्रपटांची रेकॉर्ड मोडली आहेत. सुकुमार दिग्दर्शित पुष्पा : द रुल हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट आज रिलीजच्या तिसऱ्या दिवशी आणि वीकेंडमध्ये 500 कोटींहून अधिक कमाई करणार आहे.
हेही वाचा -
'पुष्पा 2'कडून शिकला सरकारनं धडा, तेलंगणात यापुढं पहाटे स्क्रिनिंगवर बंदी
पुष्पा 2 सारख्या चित्रपटामुळे मराठी चित्रपटांना मिळत नाही थिएटर, नेमकं प्रकरण काय?