मुंबई : 'पुष्पा 2: द रुल' बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. दरम्यान चौथ्या सोमवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी घट झाली आहे. रिलीजच्या 26व्या दिवशी या चित्रपटानं आजपर्यंतचे सर्वात कमी कलेक्शन केलं आहे. मात्र नवीन वर्षात पुन्हा कमाईमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 'पुष्पा 2'नं 25 दिवसांत जगभरात 1750 कोटींचा आकडा पार केला आहे. एका रिपोर्टनुसार हा, चित्रपट जगभरात 1,800 कोटी रुपये सहज कमवू शकतो. बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा 2' चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटानं पहिल्या आठवड्यात 725.8 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 264.8 कोटी आणि तिसऱ्या आठवड्यात 129.5 कोटी कमावले आहेत.
'पुष्पा 2: द रुल'चं कलेक्शन : सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटानं चौथ्या शुक्रवारी 8.75 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. चौथ्या शनिवारी 12.5 कोटी रुपये आणि चौथ्या रविवारी 15.65 कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटानं रिलीजच्या 26व्या दिवशी 6.65 कोटीचं कलेक्शन केलं आहे. ही चित्रपटाची आतापर्यंतची सर्वात कमी कमाई आहे. अल्लू अर्जुनच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 26व्या दिवसापर्यंत भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण 1163.65 कोटींची कमाई केली आहे. 'पुष्पा 2'च्या हिंदी शोबद्दल बोलायचं झालं तर, निर्मात्यांनुसार हा चित्रपट 26 दिवसांत 775.50 कोटीवर पोहोचला आहे.
The NUMBER ONE HINDI FILM OF ALL TIME continues its monstrous run at the box office 💥💥#Pushpa2TheRule collects 770.25 CRORES NETT in 25 days ❤🔥
— Mythri Movie Makers (@MythriOfficial) December 30, 2024
Book your tickets now!
🎟️ https://t.co/tHogUVEOs1#Pushpa2#WildFirePushpa
Icon Star @alluarjun @iamRashmika @aryasukku… pic.twitter.com/vE61XHSCtj
#Pushpa2TheRule continues its RECORD BREAKING RUN at the BOX OFFICE 💥💥
— Mythri Movie Makers (@MythriOfficial) December 30, 2024
The WILDFIRE BLOCKBUSTER crosses 1760 CRORES GROSS WORLDWIDE in just 25 days ❤🔥
Book your tickets now!
🎟️ https://t.co/tHogUVEgCt#Pushpa2#WildFirePushpa
Icon Star @alluarjun @iamRashmika @aryasukku… pic.twitter.com/7D3PBnt3oN
'पुष्पा 2' जगभरातील कलेक्शन : निर्मात्यांनी गेल्या सोमवारी 'पुष्पा 2' च्या जगभरातील कलेक्शनची माहिती दिली. त्यांनी आता अधिकृतपणे आकडे जाहीर केले आहेत. 'पुष्पा 2'चं जगभरात ग्रॉस कलेक्शन 1788.06 कोटी रुपयांचं झालं आहे. अल्लू अर्जुनचे पोस्टर शेअर करत एक्सवर चित्रपटाच्या निर्मात्यांनी लिहिलं, 'पुष्पा 2'नं बॉक्स ऑफिसवर आपली रेकॉर्डब्रेक कमाई सुरू ठेवली आहे. 'वाइल्डफायर ब्लॉकबस्टर'नं अवघ्या 25 दिवसांत जगभरात 1760 कोटी रुपयांचा टप्पा पार केला.' हा चित्रपट प्रभासच्या 'बाहुबली 2' चित्रपटाला मागे टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट प्रचंड कमाई करत आहे. 'पुष्पा 2'मध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना, फहाद फासिल, जगपती बाबू आणि राव रमेश यांच्या विशेष भूमिका आहेत. हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला.
हेही वाचा :