ETV Bharat / entertainment

Pulkit And Kriti Wedding : पुलकित सम्राटचे मुंबईतील निवासस्थान दिव्यांनी उजळले; 'या' दिवशी होणार लग्न - Pulkit Samrat

Pulkit And Kriti Wedding : पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा लवकरच विवाहबंधनात अडणार आहेत. सोशल मीडिया एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये पुलकितचं घर सजलेलं दिसत आहे.

Pulkit Samrat and Kriti Kharbanda Wedding
पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदाचं लग्न
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 12, 2024, 11:11 AM IST

मुंबई - Pulkit And Kriti Wedding : अभिनेता पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा 13 मार्च 2024 रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हे जोडपे सात फेरे घेतील. या जोडप्यानं अद्याप त्यांच्या लग्नाबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान, पुलकितच्या घरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांच्या लग्नाबद्दल अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू होत्या. या जोडप्याच्या घरात लग्नाच्या जोरदार तयारी सुरू आहेत.

पुलकित आणि क्रितीचं लग्न : आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पुलकितचे मुंबईतील घर दिव्यांनी सजलेले दिसत आहे. या जोडप्याच्या लग्नाच्या उत्सवाची सुरुवात झाली आहे. पुलकित आणि क्रिती हरियाणातील मानेसर येथील आईटीसी ग्रैंड भारतमध्ये सात फेरे घेणार असल्याचं समजत आहे. अलीकडेच या जोडप्याच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. हे व्हायरल कार्ड अ‍ॅनिमेशनवर आधारित होत. या कार्डवर एक मुलगा बाल्कनीत गिटार घेऊन बसलेला होता. या मुलाबरोबर एक मुलगीही तिथे बसलेली दिसत होती. हे दोघेही समुद्राकडे बघत होते. याशिवाय कार्डमध्ये दोन श्वानही होते. पुलकित आणि क्रितीच्या लग्नाचं कार्ड हे थोड वेगळे आणि हटके आहे.

पुलकित आणि क्रितीचं वर्कफ्रंट : पुलकित सम्राटनं इस्टास्टोरीवर शेअर केलेल्या कार्डच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होत, ''माझ्या मित्रांबरोबर सेलिब्रेट करण्यासाठी आता मी प्रतीक्षा करू शकत नाही. लव्ह पुलकित अ‍ॅन्ड क्रिती.'' पुलकित आणि क्रितीची प्रेमकहाणी 2019 मध्ये सुरू झाली. 'पागलपंती' चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. ही जोडी 'वीरे की वेडिंग' आणि 'तैश' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्येही एकत्र दिसली आहेत. दरम्यान पुलकित आणि क्रितीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी 'फुकरे 3' या चित्रपटामध्ये दिसला होता. दुसरीकडे क्रिती ही 'हाऊसफुल्ल 5', 'वान', 'रिस्की रोमियो' आणि 'पप्पु' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. Bhool Bhulaiyaa 3 Shooting Video : कार्तिक आर्यन स्टारर 'भूल भुलैया 3' चित्रपटाचं शूटिंग सुरू
  2. Christopher Nolan Movies : ऑस्कर विजेते सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलनचे 5 धमाकेदार चित्रपट
  3. Cillian Murphy : सिलियन मर्फीनं त्याचा पहिला ऑस्कर अवार्ड जे. रॉबर्ट ओपेनहायमरला केला समर्पित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.