ETV Bharat / entertainment

पुलकित सम्राटची पत्नी क्रिती खरबंदानं 'पहिल्या रसोई'चे फोटो केले शेअर - Pulkit Samrat bride Kriti Kharbanda

Kriti Kharbanda Pehli Rasoi : क्रिती खरबंदानं तिच्या 'पहिल्या रसोई'चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती रव्याच्या हलव्याला सजवताना दिसत आहे.

Kriti Kharbanda Pehli Raso
क्रिती खरबंदाची पहिली रसोई
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 19, 2024, 4:44 PM IST

मुंबई - Kriti Kharbanda Pehli Rasoi : अभिनेता पुलकित सम्राट आणि अभिनेत्री क्रिती खरबंदानं 15 मार्च रोजी आयटीसी मानेसर (गुरुग्राम) येथे विवाह केला. या जोडप्याचं लग्न खूप चर्चेत होतं. आता दोघांच्या लग्नामधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान या जोडप्याच्या लग्नानंतर क्रितीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या 'पहिल्या रसोई'चे फोटो शेअर केले आहेत. किचनच्या पहिल्या सोहळ्यात क्रितीनं गुलाबी रंगाचा सूट घातला आहे आणि स्वयंपाकघरात रव्याचा हलवा बनवला आहे. या हलव्यावर तिनं चिरलेले बदाम सुंदरपणे लावले आहेत. हा हलवा पाहून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटू शकते.

Kriti Kharbanda Pehli Rasoi
क्रिती खरबंदा पहिली रसोई

क्रिती खरबंदाची पहिली रसोई : क्रितीनं या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'माझी पहिली रसोई'. क्रितीची पहिली स्वयंपाकघरातील विधी यशस्वी झाली आणि तिला आजीनं आर्शीवाद देखील दिला आहे. स्वयंपाकघरातील पहिला विधी पार पडल्यानंतर आणि आजी-सासऱ्यांचा आर्शीवाद मिळाल्यानंतर क्रिती ही आनंदी झाली आहे. याआधी क्रितीच्या गृहप्रवेशाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हिडिओमध्ये क्रिती ही पुलकित आणि त्याच्या कुटुंबियांबरोबर डान्स करताना दिसली होती. क्रितीचा हा व्हिडिओ अनेकांना आवडला होता. पुलकित आणि क्रितीनं खूप साध्या पद्धतीनं लग्न केलंय. हे दोघेही मुळचे दिल्लीचे आहेत.

पुलकित आणि क्रितीची प्रेमकहाणी : या जोडप्याच्या प्रेमकहाणीबद्दल बोलायचं झालं तर, पुलकित आणि क्रिती 2019 मध्ये 'पागलपंती' चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. यानंतर त्याच्यात चांगली मैत्री झाली आणि दोघेही एकामेंकाच्या प्रेमात पडले होते. पुलकित आणि क्रितीनं 'वीरे की वेडिंग', 'तैश' आणि 'पागलपंती' या चित्रपटात एकत्र काम केलंय. हे सुंदर जोडपं लग्न करून आपल्या घरात स्थायिक झाले आहे. क्रितीचे तिच्या सासरच्या मंडळींकडून जोरदार स्वागत झाले आहे, यामुळे ती खूप आनंदी आहे. पुलकित सम्राटचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी त्यानं 2014 मध्ये गर्लफ्रेंड श्वेता रोहिराबरोबर लग्न केलं होतं, जे 2015 मध्ये तुटले आणि दोघांचा घटस्फोट झाला.

हेही वाचा :

  1. Citadel: Honey Bunny : वरुण धवन आणि समंथा रुथ प्रभू स्टार वेब सिरीजचे शीर्षक असेल 'सिटाडेल : हनी बनी' !
  2. केरळमध्ये मोठ्या संख्येनं चाहत्यांच्या गर्दीनंतर थलपथी विजयच्या कारचं झालं नुकसान
  3. ऐश्वर्या राय बच्चननं आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त शेअर केली भावनिक पोस्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.