ETV Bharat / entertainment

Pulkit and Kriti Kharbanda : पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा लग्नानंतर मुंबईला परतले, विमानतळावर केले मिठाई वाटप - Pulkit Samrat and Kriti Kharbanda

Pulkit Samrat and Kriti Kharbanda : पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा लग्नानंतर आता मुंबईत परतले आहेत. त्याचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हे जोडपे पापाराझीला मिठाई वाटप करताना दिसत आहे.

Pulkit Samrat and Kriti Kharbanda
पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 21, 2024, 11:14 AM IST

मुंबई - Pulkit Samrat and Kriti Kharbanda : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुंदर जोडपे पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा लग्न करून आता मुंबईत परतले आहेत. या जोडप्यानं 15 मार्च रोजी गुरुग्राममधील ग्रँड आयटीसी भारत येथे सात फेरे घेतले असून आता दोघेही मुंबई विमानतळावर स्पॉट झाले आहेत. मुंबई विमानतळावर पोहचल्यानंतर या जोडप्यानं पापाराझीला लग्नाची मिठाई वाटली. लग्नानंतर, या जोडप्याचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर क्रिती आणि पुलकितला चाहते आणि सेलिब्रिटी लग्नासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. या जोडप्यानं खूप साध्या पद्धतीनं विवाह केला आहे.

पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदाचा लूक : मुंबई विमानतळावर पुलकितनं निळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा परिधान केला होता, तर क्रितीनं गुलाबी रंगाचा अनारकली सूट घातला होता. यावर तिनं भांगात कुंकु भरलंय. याशिवाय तिनं हातात लाल लग्नाच्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र घातले आहे. या जोडप्याच्या चेहऱ्यावर त्यांच्या लग्नाचा आनंद स्पष्ट दिसून येत आहे. याशिवाय 20 मार्च रोजी पुलकित आणि क्रितीनं त्यांच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले होते. मेहंदी सोहळ्याच्या फोटोंमध्ये, पुलकितनं हिरव्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता आणि क्रिती ऑफ व्हाईट रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. या जोडप्यानं त्याच्या मेहंदी सोहळ्यात खूप एन्जॉय केल्याचं फोटोवरून दिसत आहे.

वर्कफ्रंट : पुलकितनं त्याच्या मेंहेदी सेरेमनीमध्ये डान्सही केला होता. दरम्यान, पुलकित आणि क्रिती 2019 मध्ये 'पागलपंती' चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. यानंतर हे दोघेही एकामेंकांना डेट करू लागले. पुलकित सम्राटचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी त्यानं 2014 मध्ये गर्लफ्रेंड श्वेता रोहिराबरोबर लग्न केलं होतं. मात्र 2015 मध्ये त्यांच नातं तुटलं आणि दोघांचा घटस्फोट झाला. दरम्यान या जोडप्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पुलकित शेवटी 'फुकरे 3'मध्ये रुचा चड्ढा आणि वरूण शर्माबरोबर दिसला होता. दुसरीकडे क्रिती शेवटी '14 फेरे'मध्ये दिसली होती. आता पुढं ती 'रिस्की रोमियो' 'वान', 'हाऊसफुल्ल 5', आणि 'पप्पू' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. Jyothika thanks Shaitan team : "शैतान हा एक प्रवास होता" म्हणत, ज्योतिकाने 'शैतान'च्या रीलसह मानले टीमचे आभार
  2. मनोज बाजपेयी अभिनीत 'भैय्या जी'चा टीझर प्रदर्शित; पाहा व्हिडिओ
  3. Magadheera to Rerelease : राम चरणचा ब्लॉकबस्टर 'मगधीरा' त्याच्या 39 व्या वाढदिवसाच्या आधी थिएटरमध्ये होणार पुन्हा प्रदर्शित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.