ETV Bharat / entertainment

पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदाचे 'रोका' समारंभाचे फोटो व्हायरल - पुलकित सम्राट लग्न

Pulkit Samrat and Kriti Kharbanda : पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा हे लवकरच लग्न करणार असल्याचं समजत आहे. त्याचे सोशल मीडियावर रोका समारंभाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Pulkit Samrat and Kriti Kharbanda
पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 30, 2024, 3:50 PM IST

मुंबई - Pulkit Samrat and Kriti Kharbanda : अभिनेत्री क्रिती खरबंदा आणि अभिनेता पुलकित सम्राट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या जोडप्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये दोघांच्या बोटात कपल रिंग दिसत आहे. आता त्याच्या या व्हायरल झालेल्या फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. रिया लुथरा नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पुलकित आणि क्रितीच्या रोका सेरेमनीचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये हे कपल त्यांच्या खास मित्रांसोबत दिसत आहे. क्रितीनं गोल्डन बॉर्डर असलेल्या रॉयल ब्लू कलरच्या अनारकली ड्रेस परिधान केला आहे. यावर तिनं केसं मोकळे सोडले आहेत. याशिवाय तिनं सोनरी मोजडीनं तिचा लूक पूर्ण केला आहे.

पुलकित आणि क्रितीचं लग्न : दुसरीकडे पुलकितबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं फ्लोरल प्रिंट व्हाइट कुर्ता परिधान केला आहे. या फोटोंमध्ये दोघांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये पुलकित हा क्रितीला मीठी मारून उभा आहे. पहिल्या फोटोंमध्ये हे जोडपे मित्र आणि कुटुंबासोबत पोझ देताना दिसत आहे. रोका समारंभाच्या या व्हायरल फोटोंवर अद्याप या जोडप्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु हे फोटो सिद्ध करतात की, हे जोडपे लवकरच लग्न करणार आहे. पुलकितचं हे दुसरे आणि क्रितीचं पहिलं लग्न असेल. पुलकित सम्राटचं पहिलं लग्न 2014 रोजी सलमान खानची जवळची बहीण श्वेता रोहिरासोबत झालं होतं.

पुलकितचं वैयक्तिक आयुष्य : पुलकितचा एका वर्षानंतर घटस्फोट झाला. पुलकित आणि यामी गौतमचं नात 2015मध्ये खूप चर्चेत होतं, यामुळे त्याचं पहिलं लग्न तुटलं असल्याचं म्हटले जाते. दरम्यान 2019 मध्ये पुलकित आणि क्रिती 'पागलपंती' या चित्रपटात एकत्र दिसले होते, या चित्रपटामुळे दोघांमध्ये जवळीकता वाढल्याचं बोलले जात आहे. हे कपल अनेकदा एकत्र दिसतात. याशिवाय दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. क्रितीही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. क्रितीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'हाऊसफुल्ल 5' 'पप्पू' आणि 'रिस्की रोमियो'मध्ये दिसणार आहे. याशिवाय दुसरीकडे पुलकित हा अखेरचा 'फुकरे 3'चित्रपटामध्ये दिसला होता.

हेही वाचा :

  1. पाकिस्तानी गायक बिलाल सईदची सटकली, प्रेक्षकांवर भिरकवला माईक!
  2. "प्रेक्षकांनी त्यांच्या हृदयात स्थान दिले", शाहरुख खानचे प्रतिपादन
  3. महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त त्यांच्यावर आधारित 'हे' 5 चित्रपट आवर्जून पाहा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.