ETV Bharat / entertainment

प्रियांका चोप्रानं जॉन सीना स्टारर ॲक्शन कॉमेडी चित्रपटाचं शूटिंग केलं पूर्ण - priyanka chopra - PRIYANKA CHOPRA

Priyanka Chopra : प्रियांका चोप्रानं हॉलिवूड चित्रपट 'हेड्स ऑफ स्टेट'चं शूटिंग पूर्ण केलं आहे. आता तिनं सोशल मीडियावर एक सुंदर पोस्ट शेअर करून याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली आहे.

Priyanka Chopra
प्रियांका चोप्रा (प्रियंका चोपड़ा(priyankachopra- instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 8, 2024, 5:01 PM IST

मुंबई - Priyanka Chopra : बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रानं तिचा हॉलिवूड चित्रपट 'हेड्स ऑफ स्टेट'चे शूटिंग पूर्ण केलं. आज 8 मे रोजी प्रियांकानं सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली आहे. तिनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपटाच्या सेटवरील फोटो आणि काही छोट्या क्लिप दिसत आहेत. या पोस्टला प्रियांकानं एक लांबलचक कॅप्शनही दिलं आहे. "आता चित्रपटाचे शूटिंग होऊन जवळपास एक वर्ष झाले आहे, खूप काही घडले आहे, पण आताही आम्ही येथे आहोत. अखेर मी काल रात्री चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. आम्ही इथे खूप मजा केली. एक दुर्मिळ संयोजन असलेला हा चित्रपट खूप विशेष होता, कारण कलाकार आणि क्रू त्यांच्या ए गेमसह दररोज तयार होऊन येत होते. मला या सर्व मोठ्या स्टार्सबरोबर काम करून खूप चांगलं वाटलं. मला आशा आहे की तुम्हालाही हा चित्रपट खूप आवडेल, हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर प्रसारित केला जाईल."

'हेड्स ऑफ स्टेट' चित्रपटाची स्टार कास्ट : या चित्रपटामध्ये प्रियांकाबरोबर माजी कुस्तीपटू जॉन सीना देखील दिसणार आहे. या चित्रपटातचं दिग्दर्शन इया नेशुलर यांनी केलंय. प्रियांका चोप्रा आणि जॉन सीना व्यतिरिक्त या चित्रपटात इद्रिस एल्बा, जैक क्वेड, कारला गुगिनो, स्टीफन रूट, पॅडी कॉसिडिन, एंबर रोज रेवाह, रिचर्ड कायले, मार्क स्मिथ और स्टीवन क्री हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची अनेकजण आतुरनं वाट पाहात आहेत. हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटासाठी प्रियांकानं खूप मेहनत घेतली आहे. 'हेड्स ऑफ स्टेट' प्रियांका चोप्राचा पाचवा हॉलिवूड प्रोजेक्ट आहे.

प्रियांकाचं हॉलिवूड वर्कफ्रंट : याआधी प्रियांका बेवॉच (2017), अ किड लाइक अ जॅक (2018), इट्स इंट रोमँटिक (2019), वुई कॅन भी हीरोज (2020), द मॅट्रिक्स रिसरेक्शन (2021) या चित्रपटांमध्ये दिसली होती आणि शेवटी ती 'लव्ह अगेन' चित्रपटात दिसली होती. याशिवाय तिनं परदेशी टीव्ही मालिका 'क्वांटिको' (2015-18) आणि वेब सीरीज 'सिटाडेल' (2023)मध्ये प्रमुख भूमिका साकरली होती. दरम्यान प्रियांकाच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर ती 'कल्पना चावला बायोपिक'मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटामध्ये झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. नुपूर शिखरेनं पत्नी आयरा खानला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, केली पोस्ट शेअर - nupur shikhare wishes wife ira khan
  2. कार्तिक आर्यननं केलं सलग 18 तास शूटिंग, 'भूल भुलैया 3'वर व्हिडिओ शेअर - Kartik Aaryan
  3. प्रेग्नेंसी फेजमध्ये दीपिका पदुकोण पती रणवीर सिंगबरोबर विमानतळावर झाली स्पॉट, फोटो व्हायरल - Ranveer Singh and Deepika Padukone

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.