मुंबई Priyanka Chopra : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या फॅमिली व्हेकेशनवर आहे. दरम्यान सोशल मीडियावर प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी त्यांच्या कौटुंबीक सुट्टीतील फोटोंनी खळबळ उडवून दिली आहे. प्रियांका, निक आणि मालती साऊथ फ्रान्समध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. प्रियांकाचे बिकिनीतील हॉट फोटो सोशल मीडियावर प्रचंड वेगानं व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये प्रियांका आणि निकनं अनेक रोमँटिक पोजही दिल्या आहेत. सोशल मीडियावर आता या जोडप्याच्या फोटोंना खूप लाइक्स येत आहेत. प्रियांका आणि निकचे हे फोटो एका यॉटची आहेत, ज्यावर मालतीही खेळताना दिसत आहे.
प्रियांका आणि निकनं शेअर केले हॉट फोटो : प्रियांकानं हे फोटो शेअर करत लिहिलं आहे की, "पुस्तकासाठी पुष्टी झाली आहे, माझ्या आयुष्यातील प्रेमाचे सुंदर क्षण, तुम्ही आता जाणून घेण्यासाठी तयार आहात?" याशिवाय निकनं देखील पत्नी प्रियांका चोप्राबरोबरचे सुंदर आणि रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. यामध्ये निक आणि प्रियांका यांच्यात सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. हे फोटो शेअर करताना निकनं, "स्वप्न." असं लिहिलं आहे. तसेच प्रियांकानं शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, "खूप सुंदर दिसत आहे." दुसऱ्या एकानं लिहिलं, "खूप सुंदर कुटुंब आहे." आणखी एकानं लिहिलं, "तुझ्या नवीन बुक लॉन्च होण्याची वाट पाहात आहे." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.
प्रियांका चोप्राचं वर्कफ्रंट : प्रियांका चोप्राच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, देसी गर्लनं नुकतेच 'द ब्लफ'चं शूटिंग पूर्ण केलं आहे. याशिवाय तिनं ऑस्ट्रेलियातमध्ये देखील एका चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलंय. प्रियांका चोप्रा 'लव्ह अगेन'मध्ये दिसली होती. आता ती 'हेड ऑफ स्टेट ' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर इद्रिस एल्बा आणि जॉन सीना महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. प्रियांका ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनेकदा ती फोटो शेअर करून चाहत्यांना तिच्याविषयीची अपडेट देत राहते.
हेही वाचा :
- 'पाणी' स्पेशल स्क्रिनिंगनंतर प्रियांका चोप्रानं केलं मुंबईला 'टाटा बाय बाय' - Priyanka Chopra
- निक जोनास-देसी गर्लची जोडी पुन्हा चर्चेत, मित्राच्या लग्नात दिसला रोमॅंटिक अंदाज - Nick Jonas shares a romantic photo
- प्रियांका चोप्रानं कुटुंबासह 'द ब्लफ'च्या क्रूबरोबर मजेशीर झलक केली शेअर - priyanka share pics and videos