ETV Bharat / entertainment

कामाच्या धबडग्यातून प्रियांका चोप्रानं काढला लेकीसाठी वेळ, केला व्हिडिओ शेअर - priyanka chopra share video

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 10, 2024, 4:39 PM IST

Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा जोनासनं एक सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मालती आणि ती ऑस्ट्रेलियातील बिचवर एन्जॉय करताना दिसत आहेत.

Priyanka Chopra
प्रियांका चोप्रा ((Photo IANS))

मुंबई - Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर एक प्रेमळ आई देखील आहे. ती सध्या ऑस्ट्रेलियात तिच्या आगामी 'द ब्लफ' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. प्रियांका एकटीच ऑस्ट्रेलियाला गेली नाही, तर ती मुलगी मालतीलाही घेऊन गेली आहे. तिच्या व्यग्र वेळापत्रकातून तिनं आपल्या लेकीसाठी वेळ काढला. प्रियांकानं रविवार समुद्रकिनाऱ्यावर घालवला. आता तिन 10 जून रोजी याची झलक आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. सोशल मीडियावर एक मनमोहक व्हिडिओ व्हायरल होत असून यात प्रियांका ही मुलगी मालतीबरोबर सुंदर समुद्रकिनारी आनंद घेताना दिसत आहे.

प्रियांका आणि मालतीचा बीचवरचा व्हिडिओ व्हायरल : व्हिडिओत प्रियांका आणि मालती बीचवर एन्जॉय करताना आहेत. यादरम्यान मालती वाळूशी खेळत असून ती तिच्या छोट्या हातात वाळू घेऊन समुद्राच्या पाण्यात टाकत आहे. याशिवाय ती बीचवर धावताना दिसते. दम्यान प्रियांकाही मालतीला फॉलो करते आणि तिची छोटीशी झलक कॅमेऱ्यात कैद करते. हा सुंदर क्षण शेअर करत देसी गर्लनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, "अशा प्रकारचा रविवार. ग्रेटफुल." प्रियांकाची पोस्ट शेअर होताच सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया यावर येऊ लागल्या आहेत. बिपाशा बसूनं यावर कमेंट करत लिहिलं, 'डॉल' तसेच भूमी पेडणेकरची बहीण समिक्षानं या पोस्टवर लिहिलं, "खूप क्यूट."तसेच सोनाली बिंद्रेनं देखील पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

चाहत्यांनी केलं मालती आणि प्रियांकाचं कौतुक : दरम्यान प्रियांका चोप्राच्या एका चाहत्यांनी या पोस्टवर लिहिलं,"मालती खूप सुंदर दिसते, ती मनमोहक आहे." दुसऱ्या एकानं लिहिलं, "मालती खूप भाग्यवान आहे, तिला इतकी चांगली आई मिळाली आहे." आणखी एकानं लिहिलं, "मालती लवकर मोठी होत आहे, तिची उंची देखील वाढली आहे." या अनेक कमेंट्स या पोस्टवर येत आहेत. याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि बेबी बॉटलवाले इमोजी पोस्ट करत आहेत. 'देसी गर्ल'च्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती नुकतेच ऑस्ट्रेलियात तिच्या पुढच्या 'द ब्लफ' चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटात कार्ल अर्बन, इस्माईल क्रूझ कॉर्डोव्हा, सफिया ओकले-ग्रीन आणि वेदांतन नायडू यांच्याही भूमिका आहेत.

हेही वाचा :

  1. 'कल्की 2898 एडी'च्या ट्रेलरनं वाढवली प्रेक्षकांची उत्कंठा, अ‍ॅडव्हान्स बुकिंगचीही उघडली खिडकी - Kalki 2898 AD Trailer
  2. अभिनेत्री नूर मालविका दासचा फ्लॅटमध्ये सापडला मृतदेह, पोलीस चौकशी सुरू - Noor Malabika Das Dies
  3. जम्मू काश्मीरमधील रियासी बस हल्ल्यात नऊ जणांच्या मृत्यूबद्दल बॉलिवूड सेलिब्रिटींनी केला शोक व्यक्त - REASI BUS ATTACK

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.