मुंबई - ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा जोनास कामासाठी मुंबईत परतली आहे. गेल्या गुरुवारी 17 ऑक्टोबर देसी गर्ल एका मेकअप ब्रँडच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी प्रियांकानं आपल्या ग्लॅमरस अवतार आणि गोड हावभावानं सर्वांची मनं जिंकली. इव्हेंटमधून प्रियांकाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. यावेळी तिनं एका गोष्टीमुळं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं, प्रियांकानं यावेळी चाहत्यांबरोबर सुंदर फोटोंसाठी पोझ दिली. प्रियांका चोप्रा या कार्यक्रमात पोहोचली, तेव्हा तिला स्टायलिश सिल्व्हर आउटफिटमध्ये पाहिल्यानंतर सर्वांच्या नजरा तिच्यावर गेल्या.
चाहत्यांनी केलं प्रियांका चोप्राच्या लूकचं कौतुक : प्रियांका चोप्राचा लूक अनेकांना आकर्षक वाट आहेत. तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करून तिचे कौतुक करताना दिसत आहेत. यावेळी तिनं सिल्व्हर मिनी ड्रेससह हाय हिल्स घातली होती. यावर तिनं लांब इयररिंग परिधान केले होते. एका व्हिडिओमध्ये पापाराझीसाठी पोझ दिल्यानंतर ती एका चाहत्याच्या टी-शर्टवर ऑटोग्राफ देताना दिसली. आता तिची हीच गोष्ट अनेकांना आवडली आहे. यादरम्यान ती काही छोट्या मुलांबरोबर फोटो काढताना दिसली. प्रियांकाच्या गोड स्वभाव हा आता अनेकांना भावला आहे. आता एका व्हायरल झालेल्या व्हिडिओवर एका यूजरनं लिहिलं, 'यामुळे प्रियांका देसी गर्ल आहे.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'प्रियांका चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्री आहे.'
प्रियांका चोप्राचे आगामी चित्रपट : यापूर्वी प्रियांकानं तिच्या इंस्टाग्रामवर मुंबईचा एक खास व्हिडिओ शेअर केला होता, यामध्ये तिनं गेटवे ऑफ इंडियाची सुंदर झलक दाखवली होती. प्रियांकानं या सुंदर व्हिडिओला 'माय फेव्हरेट गेटवे' असं कॅप्शन दिलं होतं. दरम्यान प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं नुकतेच फ्रँक ई फ्लॉवर्स दिग्दर्शित 'द ब्लफ'चं शूटिंग पूर्ण केलं आहे. 'द ब्लफ' व्यतिरिक्त, प्रियांका जॉन सीना आणि इद्रिस एल्बाबरोबर 'हेड्स ऑफ स्टेट' या चित्रपटामध्ये झळकणार आहे. याशिवाय प्रियांकाकडे 'सिटाडेल'चा दुसरा सीझनही आहे. यात ती पुन्हा एकदा नादियाची भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा :