मुंबई - Bade Miyan Chote Miyan : अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा दमदार ट्रेलर 26 मार्चला रिलीज झाला. हा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडल्याचं दिसतं. ट्रेलर पाहून चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटातून अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटामध्ये दोन्ही ॲक्शन स्टार्स जबरदस्त स्टंट करताना दिसणार आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यास फारसा वेळ उरलेला नाही. दरम्यान, याआधी 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटामधील खलनायकाची भूमिका साकारणारा साऊथ अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनचा धमाकेदार अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
'बडे मियाँ छोटे मियाँ'मधील खलनायकाचा लूक : 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटामधील सुकुमारनचा लूक 30 मार्च रोजी रिलीज करण्यात आला आहे. त्याचा चेहरा अद्याप दाखवलेला नाही. सुकुमारनच्या चेहऱ्यावर मास्क असल्यानं त्याचा चेहरा पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. निर्मात्यांनी खलनायकाचा लूक शेअर करत लिहिलं, "आमच्या ॲक्शन हिरोचा अँटी-हिरो येथे आहे.'' या पोस्टरमध्ये सुकुमारन हा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये असून त्याच्या चेहऱ्यावर मास्क असल्याचं दिसत आहे. या चित्रपटामध्ये मानुषी छिल्लर, सोनाक्षी सिन्हा, जान्हवी कपूर, आलिया इब्राहिम, जुगल हंसराज आणि इतर कलाकार दिसणार आहेत.
अक्षय कुमारनं दिला टायगरला सल्ला : 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या ट्रेलर लॉन्चवेळी अक्षय कुमारनं टायगर श्रॉफची खिल्ली उडवत त्याला म्हटलं होत की, ''मी टायगर एकच सल्ला देतो की, तू एकाच दिशेला राहत जा." यानंतर तिथे उपस्थित असलेले लोक हसायला लागली होती. टायगर श्रॉफची दिशा ही बॉलिवूडमधील पहिली गर्लफ्रेंड होती. आता त्यांच्या ब्रेकअपला बराच काळ लोटला आहे. टायगर आणि दिशा जेव्हा रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा ते एकत्र वर्कआउट करायचे. 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाबद्दल बोलताना, त्याच्या दमदार ट्रेलरनं सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी बोलायचं झालं, तर हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ'चे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलंय.
हेही वाचा :