ETV Bharat / entertainment

प्रीती झिंटा सहा वर्षानंतर बॉलीवुडमध्ये परतणार, पोस्ट शेअर करत दाखवली 'लाहोर 1947'ची झलक - preity zinta share post - PREITY ZINTA SHARE POST

Lahore 1947 : प्रीती झिंटानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं 'लाहोर 1947' चित्रपटाच्या सेटवरची झलक शेअर केली आहे.

Lahore 1947
लाहोर 1947 (प्रीति जिंटा (फाइल फोटो) (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 2, 2024, 1:02 PM IST

Updated : Jun 2, 2024, 1:08 PM IST

मुंबई - Lahore 1947 : प्रीती झिंटा ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक आहे. तिनं 'दिल से' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केल्यानंतर 'कल हो ना हो', 'कभी अलविदा ना कहना' आणि 'वीर जरा' यांसारखे अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. आता ती बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान निर्मित 'लाहोर 1947' या चित्रपटातून दीर्घ काळानंतर मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकतेच या प्रीतीनं एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिनं 'लाहोर 1947'ची स्क्रिप्ट आणि चित्रपटाच्या टीमची झलक दाखवली आहे.

प्रीती झिंटानं शेअर केली पोस्ट : प्रीतीनं हा सर्वात कठीण चित्रपट असल्याचेही या पोस्टद्वारे सांगितलं आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, "लाहोर 1947'चं शूटिंग पूर्ण झालं आहे. या अद्भुत अनुभवासाठी मी संपूर्ण कलाकार आणि क्रूचे आभार मानते. मी मनापासून आशा करते की, तुम्ही सर्वजण या चित्रपटाचे कौतुक कराल. आम्हाला हा चित्रपट बनवताना जितका आनंद मिळाला तितकाच तुम्ही देखील घ्याल. माझा हा आतापर्यंतच्या कारकिर्दीमधील सर्वात कठीण चित्रपटांपैकी एक आहे. आमिर, सनी, शबाना जी, संतोष सिवान आणि ए .आर. रहमान यांचे मनःपूर्वक आभार." आता या पोस्टवर काही चाहते कमेंट्स करून या चित्रपटाविषयी उत्सुक असल्याचं सांगत आहे.

प्रीती-सनी देओलची जोडी : 'लाहोर 1947' हा चित्रपट राजकुमार संतोषी दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटात सनी देओल आणि प्रीती झिंटा पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. याआधी प्रीती आणि सनीनं 'हीरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय', 'फर्ज' आणि 'भैयाजी सुपरहिट' यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. प्रीती शेवटी 'भैयाजी सुपरहिट'मध्ये दिसली होती. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. प्रीती तब्बल 6 वर्षांनंतर पुन्हा एकदा आपले अभिनय कौशल्य दाखवण्यासाठी परत येत आहे.

हेही वाचा :

  1. सलमान खानवर हल्ल्याचा आणखी एक कट; बिश्नोई गँगच्या 4 शूटर्संना अटक, हल्ल्यासाठी मागवणार होते पाकिस्तानातून शस्त्र - Salman Khan Firing Case
  2. व्हायरल अलर्ट! शाहरुख खान स्पेनमध्ये सुहाना खानबरोबर करतोय 'किंग'चं शूटिंग? - Shah Rukh Khan in Spain
  3. आर माधवन वाढदिवस : प्रतिभावान अभिनेत्याचा प्रवास, टॉप 5 चित्रपट, हिट गाणी आणि आगामी चित्रपट - R Madhavan Birthday

Last Updated : Jun 2, 2024, 1:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.