ETV Bharat / entertainment

प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन आलं समोर, पाहा आकडा

मराठी चित्रपट 'फुलवंती' हा रुपेरी पडद्यावर बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाल्यानंतर आता चर्चेत आहे. या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलं आहे.

Prajakta Mali
प्राजक्ता माळी (प्राजक्ता माळी - (instagram))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 14, 2024, 4:30 PM IST

मुंबई - पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित 'फुलवंती' हा 11 ऑक्टोबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये प्राजक्ता माळीनं 'फुलवंती'ची मुख्य भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे प्राजक्तानं या चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलय. 'फुलवंती' या चित्रपटाकडून प्राजक्ता माळीला खूप अपेक्षा आहेत. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अपेक्षेपेक्षा कमी कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन तीन दिवस झालेत. आता 'फुलवंती' चित्रपट रिलीजच्या चौथ्या दिवसात आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तीन दिवसात किती कमाई केली, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

'फुलवंती' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन : 'फुलवंती'चं बॉक्स ऑफिसवरचं तीन दिवसाचं कलेक्शन आता समोर आलं आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 8 लाखांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी तब्बल 36 लाख कमाई केली. यानंतर रविवारी या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ पाहायला मिळाली. या दिवशी 'फुलवंती'नं 75 लाखांची कमाई केली. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 1 कोटी 19 लाखचं झालं आहे. आता रिलीजच्या चौथ्या दिवशी हा चित्रपट किती कमाई करेल, यावर अनेकांचं लक्ष लागलं आहे. 'फुलवंती' या चित्रपटामधील प्राजक्ताचा अभिनय अनेकांना आवडत आहेत.

'फुलवंती' चित्रपटाबद्दल : 'फुलवंती' चित्रपटामध्ये प्राजक्ता माळी व्यतिरिक्त प्रमुख भूमिकेत गश्मीर महाजनी आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन स्नेहल तरडे यांनी केलं आहे. 'फुलवंती'मधील डायलॉग प्रवीण तरडे यांनी लिहिले आहेत. या चित्रपटाचा रन टाईम हा 2 तास 14 मिनिटांचा आहे. दरम्यान 'फुलवंती' या चित्रपटाच्या प्रीमियरला बरेच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आले होते. यानंतर मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून प्राजक्ता माळीला तिच्या चित्रपटासाठी शुभेच्छा देखील दिल्या होत्या. या चित्रपटाला सध्या प्रेक्षक संमिश्र प्रतिसाद देत आहेत. आता हा चित्रपट रुपेरी पडद्यावर किती कमाई करेल, हे पाहणं लक्षणीय ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. स्नेहल प्रविण तरडे दिग्दर्शित ‘फुलवंती’मधून प्राजक्ता माळीचं चित्रपट निर्मितीत पदार्पण - Prajakta Mali

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.