ETV Bharat / entertainment

वायनाड भूस्खलनग्रस्तांना मदत करण्यासाठी प्रभासनं दिली 2 कोटी रुपयांची देणगी - Wayanad landslide relief

Prabhas Donates To Wayanad Landslide Victims : 'बाहुबली' स्टार प्रभासनं वायनाड भूस्खलनग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानं केरळच्या मुख्यमंत्री मदत निधीला 2 कोटी रुपये दिले आहेत.

Wayanad Landslide Prabhas
वायनाड भूस्खलन प्रभास ((Photo: ANI/ETV Bharat))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 7, 2024, 1:36 PM IST

मुंबई Prabhas Donates To Wayanad Landslide Victims : केरळमधील वायनाड भूस्खलन प्रकरणातील पीडित कुटुंबांच्या मदतीसाठी एकापाठोपाठ एक साऊथ स्टार्स पुढं येत आहेत. तामिळ सुपरस्टार चियान विक्रमनं नुकतेच केरळच्या मुख्यमंत्री मदत निधीला पीडितांच्या मदतीसाठी 20 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. आता 'बाहुबली' स्टार प्रभासनं वायनाड भूस्खलनग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढं केला आहे. 'कल्की 2898 एडी'च्या यशाचा आनंद घेत असलेल्या प्रभासनं मुख्यमंत्री मदत निधीला 2 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. आता या मदतीनंतर प्रभासचे चाहते सोशल मीडियावर त्याच्या चांगल्या कामाबद्दल त्याचं कौतुक करताना दिसत आहेत.

प्रभासनं केली केरळसाठी 2 कोटीची मदत : प्रभास आजकाल त्याचा मेगा-ब्लॉकबस्टर चित्रपट 'कल्की 2898 एडी'मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 27 जून रोजी जगभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 41 दिवस पूर्ण केले आहेत. 'कल्की 2898 एडी'नं भारतीय बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'जवान'चा देशांतर्गत 41 दिवसात कमाईचा विक्रम मोडला आहे. 'जवान'नं भारतीय बॉक्स ऑफिसवर 640.25 कोटी रुपयांची कमाई केली होती. तसेच 'कल्की 2898 एडी'नं 644.38 कोटी रुपयांची कमाई करून हा टप्पा गाठला आहे. दरम्यान, वायनाड भूस्खलनग्रस्तांसाठी प्रभासची ही मदत खूप मोठी आहे. प्रभासच्या आधी अल्लू अर्जुननं 25 लाख रुपये, मेगास्टार चिरंजीवी आणि त्यांचा मुलगा अभिनेता राम चरणनं वायनाड भूस्खलनात बळी पडलेल्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री मदत निधीला 1 कोटी रुपयांची देणगी दिली होती.

वायनाड जिल्ह्यात अजूनही बचाव कार्य सुरू : वायनाड भूस्खलनात मृतांचा आकडा 400 च्या जवळ पोहोचला असून सुमारे 200 लोक बेपत्ता आहेत. 30 जुलै रोजी केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीच्या अनेक डोंगराळ भागात भूस्खलनानं मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली होती. भूस्खलनग्रस्त भागात चुरलमाला आणि मुंडक्काई येथे जवानांचं मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. केरळमधील लोकांनासाठी आता अनेकज मदत करत आहेत.

हेही वाचा :

  1. पाहा, प्रभासच्या 'द राजा साब'ची पहिली झलक, जाणून घ्या रिलीज तारीख - The Raja Saab First look
  2. प्रभास स्टारर 'राजा साब'चं टीझर होणार 'या' तारखेला रिलीज, निर्मात्यानं नवीन पोस्टर केलं शेअर - Raja Saab teaser
  3. प्रभासनं 'अ‍ॅक्शन'कडून 'रोमान्स'कडे वळवला मोर्चा, हनू राघवपुडीच्या फिल्म शूटिंगला होणार सुरूवात - PRABHAS UPCOMING FILMS

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.