मुंबई - Poonam Pandey reveals the truth : मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेनं अलीकडेच तिच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवून टीव्ही, हिंदी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी आणि तिच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. तिचा मृत्यू कर्करोगानं झाल्याचं तिच्या टीमनं सांगितलं होतं. यानंतर पूनम पांडेच्या मृत्यूची खोटी बातमी सोशल मीडियावर वेगानं पसरली होती. अनेक सेलिब्रिटींनी यावर प्रतिक्रिया देत तिला श्रद्धांजली वाहिली होती. मृत्यूची खोटी बातमी पसरवल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूनम सोशल मीडियावर आली आणि तिनं कर्करोग जनजागृती मोहिमेअंतर्गत पोस्ट केल्याचं उघड केलं. यानंतर अनेकजण तिच्यावर संतापले
पूनम पांडे पुन्हा एकदा झाली ट्रोल : पूनम पांडेला सोशल मीडियावर अनेकांनी ट्रोल केलं. यावेळी राखी सावंतनं सोशल मीडियावर पूनमवर जोरदार टीका केली. आता पूनमन आपल्या इन्स्टाग्रामवरून त्या सर्व पोस्ट हटवल्या ज्यात ती कॅन्सर मोहिमेशीविषयी जनजागृती करत आहे. दरम्यान मृत्यूची खोटी बातमी पसरवल्यामुळे ती अडचणीत सापडली आहे. 18 फेब्रुवारीला एका पोस्टमध्ये पूनम पांडेनं सांगितलं की, ती लवकरच सत्य उघड करणार आहे. आज तिनं एक खुलासा केला आहे. तिनं इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, ''मी म्हटल्याप्रमाणे सत्य बाहेर आणेन, आता सत्य जाणून घ्या. आम्हाला कायदेशीर नोटीस पाठविण्यात आलेली आहे.'' तिच्या या पोस्टवर अनेकजण तिला पुन्हा एकदा ट्रोल करताना दिसत आहेत.
पूनमची मृत्यूची पोस्ट : पूनम पांडेनं 2 फेब्रुवारी 2024 रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये लिहिलं होतं की,"आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी खूपच धक्कादायक आहे. कॅन्सशी झुंझ देणारी पूनम पांडे आपल्याला सोडून गेली आहे. तिला गर्भाशयाचा कर्करोग होता, असं या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं होतं. यानंतर अनेकांना या घटनेवर दुःख व्यक्त केलं होतं. दरम्यान पूनम सोशल मीडियावर खूप सक्रिय असून अनेकदा ती आपले फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असते. 2013 मध्ये 'नशा' या चित्रपटातून तिनं हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.
हेही वाचा :