ETV Bharat / entertainment

मनू भाकरनं कांस्यपदक जिंकल्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव, वाचा कोण काय म्हणाले? - Celebs congratulate Manu Bhaker - CELEBS CONGRATULATE MANU BHAKER

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये भारतीय महिला नेमबाज मनू भाकरनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत कांस्यपदक जिंकलं. या यशाबद्दल चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनी तिचं अभिनंदन केलंय.

Paris Olympics 2024
पॅरिस ऑलिम्पिक 2024 ((Instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 29, 2024, 10:45 AM IST

Updated : Jul 29, 2024, 2:33 PM IST

मुंबई - Paris Olympics 2024 : भारतीय महिला नेमबाज मनू भाकरनं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नेमबाजीत कांस्यपदक जिंकलं आहे. 2024च्या ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशासाठी पहिलं पदक जिंकल्यानंतर तिच्यावर अनेकजण अभिनंदनाचा वर्षाव करत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील तिचे अभिनंदन केलंय. याशिवाय चित्रपटसृष्टीतील काही स्टार्सनं मनूला तिच्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

Paris Olympics 2024
पॅरिस ऑलिम्पिक 2024 ((Instagram))

रविवार, 28 जुलै रोजी भारताची महिला नेमबाज मनू भाकरनं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचला आहे. तिनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत कांस्यपदक जिंकलंय. नेमबाजी खेळात भारतीय महिलेनं ऑलिम्पिक पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Paris Olympics 2024
पॅरिस ऑलिम्पिक 2024 ((Instagram))
Paris Olympics 2024
पॅरिस ऑलिम्पिक 2024 ((Instagram))

मनू भाकरवर अभिनंदनाचा वर्षाव : मनू भाकरला दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, करीना कपूर, आलिया भट्ट, अनिल कपूर, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, सुनील शेट्टी, कियारा अडवाणी यांच्यासह अनेक चित्रपट कलाकारांनी या खास विजयाबद्दल अभिनंदन केलंय. अनुष्का शर्मानं मनुचा एक फोटो शेअर करून इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलं की, "ताऱ्यावर निशाणा साधून इतिहास रचला. अभिनंदन मनू, आम्हाला तुझा अभिमान वाटतो." यानंतर दीपिका पदुकोणनं इंस्टाग्राम स्टोरीवर मनुचा एक फोटो शेअर करून तिचे अभिनंदन केलं आहे. तसेच रणवीर सिंगनं देखील इन्स्टाग्राम स्टोरीत एक फोटो शेअर करून तिचं अभिनंदन केलंय.

Paris Olympics 2024
पॅरिस ऑलिम्पिक 2024 ((Instagram))
Paris Olympics 2024
पॅरिस ऑलिम्पिक 2024 ((Instagram))

बॉलिवूड सेलिब्रिटींनी केलं कौतुक : करीना कपूर खाननं मनूचा एक फोटो शेअर केला आणि लिहिलं, "पॅरिस ऑलिम्पिक 2024मधील पहिलं पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे. तुझा खूप अभिमान आहे. तुझं अभिनंदन." आलिया भट्टनंदेखील इंस्टाग्राम स्टोरी करून लिहिलं, "आपलं पहिलं पदक, या मोठ्या यशासाठी अभिनंदन." याशिवाय सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, सारा अली खान, शिल्पा शेट्टी, जॅकी श्रॉफ, प्रिती झिंटा, तापसी पन्नू, आयुष्मान खुराना, कार्तिक आर्यन, सोनम कपूर आणि इतर स्टारनंही मनु भाकरला तिच्या ऐतिहासिक विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. 22 वर्षीय मनू भाकरनं 221.7 गुण मिळवून तिसरे स्थान पटकावले. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे.

Paris Olympics 2024
पॅरिस ऑलिम्पिक 2024 ((Instagram))
Paris Olympics 2024
पॅरिस ऑलिम्पिक 2024 ((Instagram))

हेही वाचा-

  1. टोकियोत पिस्तूल तुटलं, डोळ्याच्या दुखापतीमुळं बॉक्सिंग सुटलं; जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर आता 'पॅरिस जिंकलं' - Paris Olympics 2024
  2. मनू भाकरचा नेमबाजीत अचूक 'निशाणा'; 10 मीटर एअर पिस्तूल महिलांच्या अंतिम फेरीत प्रवेश, देशाला मिळणार पहिलं पदक? - Paris Olympics 2024

Last Updated : Jul 29, 2024, 2:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.