ETV Bharat / entertainment

गरोदर असल्याच्या बातमीची परिणीतीनं काढून टाकली हवा, मिश्कील पोस्टसह केलं खंडण - PARINEETI CHOPRA PREGNANCY RUMOUR

Parineeti Chopra Pregnancy Rumour : परिणीती चोप्रा गरोदर असल्याच्या चर्चेमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं होतं. मात्र तिनं मिश्कील इन्स्टा स्टोरी शेअर करत त्या बातमीची हवा काढून टाकली आहे. या बातमींचं तिनं मजेशीर खंडन केलंय.

Parineeti Chopra
परिणीती चोप्रा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 1, 2024, 6:09 PM IST

Updated : Apr 2, 2024, 3:52 PM IST

मुंबई - Parineeti Chopra Pregnancy Rumour : अभिनेत्री परिणीती चोप्रा तिच्या गरोदरपणाच्या चर्चेमुळे अलीकडेच चर्चेत आली. दिलजीत दोसांझ सह-अभिनेत्री म्हणून चमकिला या आगामी चित्रपटात काम करत असलेल्या परिणीतीनं 'अमर सिंग चमकिला' ट्रेलर लॉन्चच्या वेळी सैल पोशाख घातला होता. त्यामुळे तिच्या गरोदरपणाच्या बातमीनं उचल खाल्ली होती. तथापि, तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर मिश्किल पद्धतीनं या अंदाजावर भाष्य केलं, तिनं फिट कपडे परिधान करीत चर्चेला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केलाय.

सेलेब्रिटी अशा बातम्यांपासून दूर जाऊ शकत नाहीत. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर फॉलोअर्सची नजर असते. नजरेला जरा जरी खटकले तरी ते तर्क वितर्क करुन अफवा निर्माण करतात आणि या अफवा खऱ्या मानून सोशल मीडियासह इतर माध्यामातून बातम्यांचेही मथळेही झळकतात. अशाच प्रकाराला परिणीती चोप्रा लक्ष्य बनली होती.

तिच्या नेटफ्लिक्स चित्रपट 'चमकिला'च्या ट्रेलर लॉन्चमध्ये ती सैल काळ्या रंगाच्या 'कफ्तान ड्रेस'मध्ये दिसल्यानंतर ही अटकळ सुरू झाली. इव्हेंटमधील व्हिडिओंमुळे सोशल मीडिया संभाव्य 'बेबी बंप' बद्दलच्या तर्कानी गोंधळ निर्माण केला. परिणीतीनं मात्र इन्स्टाग्राम स्टोरीजवर तातडीनं प्रतिसाद दिला, आणि एक झटक्यात गृहितकं खोडून काढली.

इंस्टाग्रामवर परिणीतीनं आठवड्याची सुरुवात एका धडाकेबाज नोटवर केली आणि पुन्हा एकदा व्हिडिओ पोस्टसह गरोदरपणाच्या अफवांना खोडून काढलं. तिनं इन्स्टास्टोरीमध्ये "माझ्या फिट कपड्यांच्या युगात प्रवेश करत आहे." असं लिहितं या अफवेतील हवा काढून घेतली.

परिणीती चोप्रा फॅशन प्रेमी आहे. त्यामुळे कामासाठी शहरांमध्ये फिरताना आणि वैयक्तिक बांधिलकी ती आपल्या फॅशनची झलक नेहमी दाखवत असते. त्यानुसारचं तिनं चमकिला ट्रेलर लॉन्च इव्हेन्टमध्ये तिनं सैल कपडे परिधान केले होते. परंतु काही लोक तिच्या खासगी गोष्टींमध्ये घुसून भाष्य करु लागल्यानं तिलाही आश्चर्य वाटलं असेल.

परिणीती चोप्रानं 24 सप्टेंबर 2023 रोजी उदयपूर येथे आप नेता राघव चढ्ढा बरोबर लग्नगाठ बांधली होती. या हाय प्रोफाईल लग्नसोहळ्याची चर्चा बराच काळ सुरू होती. अनेक व्हिडिओ आणि लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. आता ती आगामी अमर सिंग चमकिला या चित्रपटात चमकिलाची गायक पत्नीची भूमिका साकरत आहे.

हेही वाचा -

  1. करीना, क्रिती, तब्बूच्या 'क्रू'ची उंच भरारी, तीन दिवसांत 30 कोटींची कमाई - Crew Box Office Day 3
  2. टायगर श्रॉफनं अक्षय कुमारला केलं 'एप्रिल फूल', प्रॅंक व्हिडिओ व्हायरल - APRIL FOOL
  3. अजय देवगण आणि आर माधवन अभिनीत चित्रपट 'शैतान' लवकरच होणार ओटीटीवर रिलीज - shaitaan Movie

Last Updated : Apr 2, 2024, 3:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.