ETV Bharat / entertainment

'पंचायत 3' फेम पंकज झानं 'गँग्स ऑफ वासेपूर' चित्रपटाबद्दल केला खुलासा... - PANKAJ JHA

Pankaj jha and pankaj tripathi : 'पंचायत 3' फेम पंकज झा याला 'गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये पंकज त्रिपाठीनं साकारलेली भूमिका ऑफर करण्यात आली होती. काही कारणामुळे त्याला या भूमिकेपासून दूर जावं लागलं होतं.

Pankaj jha and pankaj tripathi
पंकज झा आणि पंकज त्रिपाठी (पंकज झा - instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 6:47 PM IST

मुंबई -Pankaj jha and pankaj tripathi : प्राईम व्हिडिओच्या प्रसिद्ध आणि यशस्वी मालिकांपैकी एक असलेल्या 'पंचायत'चा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अनेकजण 'पंचायत सीझन 3'ची खूप आतुरतेने वाट पाहत होते. या वेब सीरीजचा तिसरा सीझन हा 28 मार्च रोजी रिलीज झाला होता. जेव्हापासून 'पंचायत'चा तिसरा सीझन प्रसारित झाला तेव्हापासून हा चर्चेत आहे. आता 'पंचायत 3'च्या पात्रांपासून ते डायलॉग्सपर्यंत बरीच चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. प्रधानजी असो किंवा सचिवजी या पात्रांनी शोमध्ये आपल्या भूमिकेला न्याय मिळवून दिला आहे. 'पंचायत'मधील पॉवरफुल आमदार पंकज झाची भूमिका देखील प्रेक्षकांना पसंत पडली आहे.

पंकज झानं केला खुलासा : पंकज झा या भूमिकेमुळे सतत चर्चेत आहे. त्यानं या वेब सीरीजमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. 'पंचायत'मधील त्यांची दबंग शैली ही खूप मनोरंजक आहे. पंकज झानं 'गुलाल', 'ब्लॅक फ्रायडे'सह अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलंय. दरम्यान 'गँग्स ऑफ वासेपूर' हा पंकज झा यांच्या यशस्वी चित्रपटांपैकी एक असू शकला असता. अनुराग कश्यपच्या 'गँग्स ऑफ वासेपूर' चित्रपटात त्याला पंकज त्रिपाठीनं साकारलेली सुलतान कुरेशीची भूमिका ऑफर करण्यात आली होती. या भूमिकेनंतर पंकज त्रिपाठी स्टार बनले. दरम्यान आता पंकज झा या भूमिकेबद्दल बोलले आहेत.

'गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये मिळाली होती महत्वाची भूमिका : पंकज झानं एका संवादादरम्यान प्रश्न विचारण्यात आला की, "गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये सुलतानची भूमिका ऑफर करण्यात आली होती, परंतु नंतर ती दुसऱ्याला मिळाली. हा सुद्धा राजकारणाचा भाग आहे का? याला उत्तर देताना पंकज झा यानं म्हटलं, "माझ्यावर राजकारणाचा प्रभाव पडत नाही. तसं झालं असतं तर पॉलिटिक्स करणारा जिंकला असता. मला या सगळ्याची पर्वा नाही." मुलाखतीदरम्यान पंकज झानं स्वत:ला डायरेक्टर मेकिंग ॲक्टर ही पदवीही दिली. यानंतर पंकज झानं पुढं सांगितलं, "मी एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी पाटण्याला गेलो होतो. तिथे मला अनुराग कश्यपचा मेसेज आला की तुला यावं लागेल. मी त्यांना सांगितलं की, मी शूटिंगमध्ये आहे आणि एक-दोन दिवसांत परत येऊ शकेन. तेव्हा मला कळलं की या भूमिकेसाठी आणखी कोणाला तरी कास्ट करण्यात आलं आहे. बरं मला अजूनही अनुराग खूप आवडतो. माझी त्याच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नाही."

हेही वाचा :

  1. "अयोध्यावासीयांबद्दल लाज वाटते", भाजपाचा पराभव दिसताच सोनू निगमची वादग्रस्त पोस्ट - Sonu Nigam controversial post
  2. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगनं घेतला फॅमिली डिनरचा आनंद, व्हिडिओ व्हायरल - deepika padukone and ranveer singh
  3. 'बिग बॉस ओटीटी 3'ला होस्ट करणार अनिल कपूर, अर्जुन कपूरनं केलं अभिनंदन - Anil Kapoor

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.