मुंबई - प्रियांका चोप्राचा पती आणि अमेरिकन गायक निक जोनास याने अलीकडेच मुंबईतील लोल्लापालूझा इंडिया म्युझिक फेस्टिव्हल 2024 मध्ये त्याचे भाऊ जो आणि केविन यांच्यासह परफॉर्मन्स सादर केला. पतीचा परफॉर्मन्स भारतात होत असतानाही प्रियंका त्यांच्या या सोहळ्यात हजर राहू शकली नाही. ती तिची छोटी मुलगी मालती मेरीच्या सोबत वेळ घालवत आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टरुन ती मुलीसोबत फिरण्याचा आनंद घेताना दिसत आहे.
एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये प्रियांकाने मालती मेरीसोबतच्या तिच्या आनंदी दिवसातील काही क्षण शेअर केले आहेत. फोटो अल्बममध्ये प्रियांका एका टेकडीवर ग्लॅमरस पोज देताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये मालती मेरी वाळूशी खेळत असल्याचे दिसत होती. मात्र, प्रियांकाने नंतर ती पोस्ट हटवली आणि तिच्या मुलीच्या फोटोशिवाय ती पोस्ट शेअर केली. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एका सुंदर आणि आनंदी कुत्र्यासोबतचा स्वतःचा फोटो देखील शेअर केला आहे.
27 जानेवारी रोजी भारतीय संगीत महोत्सवादरम्यान निक जोनास, जो जोनास आणि केविन जोनास या जोनास ब्रदर्सनी प्रेक्षकांना वेड लावणारा परफॉर्मन्स सादर केला. इव्हेंटमधील एका क्लिपमध्ये प्रियांकाचा नवरा स्टेजवर आल्यावर प्रेक्षक त्याला 'जीजू, जिजू' म्हणत असल्याचे दिसून आले. प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर प्रेमाची कबुली देत व्हिडिओ शेअर करत लिहिले , "जीजू! माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे."
प्रियांकाने चाहत्यांसाठी कृतज्ञता संदेश देखील पोस्ट केला आणि जोनास ब्रदर्सवर प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल आणि त्यांचे मनापासून स्वागत केल्याबद्दल भारतातील तमाम चाहत्यांचे आभार मानले. विशेष म्हणजे, भारतीय अभिनेत्री तापसी पन्नूने देखील जोनास ब्रदर्सच्या लाईव्ह कार्यक्रमात हजेरी लावली आणि कॉन्सर्टमधील क्लिपसह 'जिजाजी'ला स्टेजवर पाहतानाचा आनंद व्यक्त केला.
कामाच्या आघाडीवर प्रियांका चोप्रा आगामी 'हेड्स ऑफ स्टेट' चित्रपटामध्ये जॉन सीना आणि इद्रिस एल्बा यांच्यासोबत झळकणार आहे. बॉलिवूडमध्ये, ती फरहान अख्तर दिग्दर्शन करणार असणाऱ्या 'जी ले जरा' चित्रपटातही काम करणार आहे. या चित्रपटात कतरिना कैफ आणि आलिया भट्ट यांच्याही भूमिका आहेत.
हेही वाचा -