ETV Bharat / entertainment

अभिनेत्री ज्योतिकाने मित्रांसह गाठले माउंट एव्हरेस्ट, पाहा व्हिडिओ झलक - Jyotika Scaling Mount Everest - JYOTIKA SCALING MOUNT EVEREST

Jyotika Scaling Mount Everest : अभिनेत्री ज्योतिकाने इंस्टाग्रामवर माउंट एव्हरेस्टच्या ट्रेकची झलक शेअर केली आहे. फोटो आणि व्हिडिओंमध्ये ती आणि तिचे मित्र शिखरावर ट्रेकिंग करताना, हिमवर्षावाचा आनंद घेताना दिसत आहेत.

Jyotika Scaling Mount Everest
ज्योतिकाने मित्रांसह गाठले माउंट एव्हरेस्ट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 30, 2024, 4:00 PM IST

मुंबई - Jyotika Scaling Mount Everest : अजय देवगणच्या सुपरनॅचरल थ्रिलर 'शैतान' चित्रपटामध्ये अभिनेत्री ज्योतिका हिने दोन दशकांहून अधिक काळानंतर हिंदी चित्रपटामध्ये पुनरागमन केले होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळालं. अलीकडेच अभिनेत्री ज्योतिकाने माउंट एव्हरेस्टचा ट्रेक करून तिची साहसी बाजू दाखवून दिली आहे. इंस्टाग्रामवर तिच्या प्रवासाचे स्निपेट्स शेअर करताना, ज्योतिकानं स्वतःचे आणि तिच्या मित्रांचे शिखरावर ट्रेकिंग करतानाचे आणि वाटेत एका आरामशीर छोट्या घरात राहण्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

ती हिमवर्षाव, भूप्रदेशातून ट्रेक करताना, स्वादिष्ट अन्नाचा आस्वाद घेताना दिसते आणि तिच्या तात्पुरत्या निवासस्थानाची झलक दाखवत असताना या फुटेजमध्ये तिचा उत्साह दिसत आहे. एका पोस्टमध्ये, ज्योतिकानं तिच्या फॉलोअर्सना एव्हरेस्ट बेस कॅम्पवरील देखाव्याचं दर्शन घडवलं आहे.

माउंट एव्हरेस्ट प्रवास सुरू करण्यापूर्वी, अभिनेत्री अजय देवगण आणि आर माधवन स्टारर सुपरनॅचरल थ्रिलर शैतान मध्ये दिसली होती. त्याआधी ती जिओ बेबीच्या दिग्दर्शनाखाली सुपरस्टार मामूट्टी बरोबर मल्याळम चित्रपट 'काथल द कोर' चित्रपटातही तिनं काम केलं होतं आणि याचं मोठं कौतुक प्रेक्षकांनी केलं होतं.

अभिनेत्री ज्योतिका आगामी दिवसात एक दृष्टिहीन उद्योगपती श्रीकांत बोल्ला यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहे आणि 10 मे रोजी रिलीज होणार आहे. त्यानंतर, ती नेटफ्लिक्सच्या 'डब्बा कार्टेल'मध्ये शबाना आझमी, गजराज राव आणि सई ताम्हणकर यांच्यासोबत दिसणार आहे.

ज्योतिकाने लग्नानंतर आपल्या चित्रपट करिअरमधून ब्रेक घेतला होता. मात्र, आता ब्रेक संपवून ती पुन्हा चित्रपटसृष्टीत दाखल झाली आहे. आता तिला वेगवेगळ्या भाषांमध्ये अनेक ऑफर्स मिळत आहेत. अलिकडेच ज्योतिकाने मुंबईला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तिनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलंय. पण काहींनी तिचे साऊथ सुपरस्टार सुर्यबरोबर ब्रेकअप होणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर तिनं स्वतः पुढं येऊन या अफवा बिन बुडाच्या असल्याचा खुलासा केला होता. सूर्या हा खूप नेहमी पाठिंबा देणारा नवरा आहे. मी आनंदी व्हावे अशी त्याची इच्छा असते. तो नेहमी आपल्या मुलांच्या करिअरला प्राधान्य देतो, असं तिनं म्हटलं होतं.

हेही वाचा -

  1. धनुष आणि रश्मिका मंदान्नाच्या 'कुबेर' अपडेटने सोशल मीडियावर धमाल - Kuber update
  2. 'आवेशम'च्या यशानंतर नाझरियाने फहाद फासिलला दिला 'चिल' राहण्याचा सल्ला - Fahadh Faasil
  3. 'द लायन किंग'चा प्रीक्वल 'मुफासा: द लायन किंग'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ - mufasa the lion king trailer out

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.