ETV Bharat / entertainment

कंगना राणौत स्टारर 'इमर्जन्सी' वादात, रिलीज डेट पुढे ढकलणार... - emergency - EMERGENCY

Kangan Ranaut : कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या रिलीजवर संकट आलं आहे. या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येणार आहे.

Kangan Ranaut
कंगना राणौत (No Relief for Kangana Ranaut's Emergency, HC Refuses to Direct CBFC, Release Pushed by Two Weeks (Photo: Film poster))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2024, 3:20 PM IST

मुंबई -Kangan Ranaut : कंगना राणौत स्टारर 'इमर्जन्सी' हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाबद्दल देशभरात विरोध होताना दिसत आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या घडामोडीत, मुंबई उच्च न्यायालयानं बुधवारी हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेतल्यानं 'इमर्जन्सी'ला मोठा धक्का बसला आहे. 6 सप्टेंबरला रिलीजसाठी सज्ज असलेला 'इमर्जन्सी' चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या अडचणीत अडकला आहे. याला अद्याप सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC)चं प्रमाणपत्र मिळालेले नाही. आता किमान दोन आठवडे हा चित्रपट रिलीज होणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.

'इमर्जन्सी' वादात : 'इमर्जन्सी'ला प्रमाणपत्र न मिळाल्यानं निर्मात्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता न्यायालयानं सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी)ला 18 सप्टेंबरपर्यंत 'इमर्जन्सी'ला प्रमाणपत्र देण्यात यावे, असे आदेश दिले आहे. यानंतर न्यायालय या याचिकेवर 19 सप्टेंबर रोजी सुनावणी करेल. सीबीएफसीनं प्रमाणपत्र तयार केले असले तरी, चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अशांतता पसरू शकते, यामुळे प्रमाणपत्र रोखण्यात आलं असल्याचं, सांगण्यात आलं होतं. बुधवारी न्यायमूर्ती बी पी कोलाबावाला आणि फिरदोश पूनीवाला यांचा समावेश असलेल्या खंडपीठानं हे मान्य केलं की प्रमाणपत्र खरोखर तयार आहे, परंतु जारी केलेलं नाही.

मध्य प्रदेश उच्च न्यायालयातही एक खटला सुरू : सीबीएफसीचे वकील अभिनव चंद्रचूड यांनी न्यायालयाला म्हटलं होतं, "जबलपूरच्या शीख समुदायानं 3 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयात 'इमर्जन्सी' प्रदर्शित करण्याच्या विरोधात याचिका दाखल केली होती. ज्याच्या सुनावणीत मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना 3 दिवसांच्या आत सीबीएफसीसमोर त्यांच्या आक्षेपांचं निवेदन सादर करण्यास सांगितलं होतं. यानंतर चंद्रचूड त्यांनी पुढं म्हटलं होतं, "मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं सीबीएफसीला योग्य पावले उचलण्यास सांगितली होती, जेव्हा मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं सीबीएफसीला हे निर्देश दिले आहेत, तेव्हा मुंबई उच्च न्यायालय त्यांना प्रमाणपत्र जारी करण्याचे निर्देश देऊ शकत नाही. जर असं केलं तर ते उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन असेल." रिलीजची तारीख जसजशी जवळ येत आहे तसा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे. शिरोमणी अकाली दलासह शीख संघटनांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे की, ऐतिहासिक तथ्यांचे चुकीचे चित्रण केलं गेलं आहे.

हेही वाचा :

  1. कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी'वर टांगती तलवार, रिलीज डेट पुढे ढकलल्यामुळे नाराज - emergency Movie
  2. कंगना रणौतनं पुन्हा एकदा रणबीर कपूरवर साधला निशाणा, काय म्हटलं जाणून घ्या... - Kangana Ranaut
  3. कंगना रणौत स्टारर 'इमर्जन्सी' चित्रपटावर बंदीची मागणी, शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीनं पाठवली नोटीस - Emergency Trailer

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.