ETV Bharat / entertainment

'रामायण'मधील रावणासाठी तयार होणार खऱ्या सोन्याचा पोशाख - nitesh tiwari upcoming film - NITESH TIWARI UPCOMING FILM

Yash Outfits For Ravan Made With Gold :नितेश तिवारी यांचा आगामी 'रामायण' चित्रपटात यश हा रावणाची भूमिका साकारणार आहे. आता या चित्रपटामधील रावणाच्या भूमिकेसाठी खऱ्या सोन्याचा ड्रेस बनवला जाणार आहे.

Yash Outfits
यशचं आउटफिट्स (साउथ स्टार यश का फाइल फोटो (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 19, 2024, 5:03 PM IST

Updated : May 19, 2024, 5:12 PM IST

मुंबई Yash Outfits For Ravan Made With Gold : दिग्दर्शक नितेश तिवारी आणि रणबीर कपूर यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'रामायण' सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचे शूटिंग मुंबईत सुरू आहे. दरम्यान, 'रामायण'बाबत एक बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, साऊथचा सुपरस्टार यश या चित्रपटात रावणाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातील लंकापती रावणाचा पोशाख खऱ्या सोन्यापासून बनवल्या जात असल्याचं सांगितलं जात आहे. या चित्रपटात यश सोन्याचे कपडे परिधान करताना दिसणार आहे. रावणाची लंका सोन्याची होती, हे सर्वांनाच माहीत आहे. रावण हा लंकेचा राजा असल्यामुळे खऱ्या सोन्याचा वापर केला जात आहे.

'रामायण' चित्रपटाचं बजेट : रिपोर्टनुसार 'पद्मावत', 'हाऊसफुल 4' आणि 'हीरामंडी: द डायमंड बाजार' या वेब सीरिजसाठी आउटफिट तयार करणारे डिझायनर जोडी रिंपल आणि हरप्रीत आता 'रामायण' चित्रपटासाठी कपडे डिझाइन करत आहेत. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रणबीर कपूर आणि साऊथ अभिनेत्री साई पल्लवी दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर हा रामाची भूमिका साकारेल आणि साई ही सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा 'रामायण' 3 भागात बनवल्या जाणार आहे. पहिल्या भागाचं बजेट 835 कोटी रुपये आहे. यश यानं चित्रपटात फक्त रावणाची भूमिका साकारली नाही, तर तो निर्माताही आहे.

यशचं वर्कफ्रंट : या चित्रपटात लारा दत्ता ही कैकेयीच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अरुण गोविल राजा दशरथाची भूमिका साकरताना दिसेल. दरम्यान 'रामायण' स्टार कास्टबद्दल निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. साई ही हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्यानं तिचे चाहते 'रामायण' चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. दरम्यान यशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी 'केजीएफ चॅप्टर 2'मध्ये दिसला. त्याचा हा चित्रपट प्रचंड हिट झाला. आता पुढं तो 'टॉक्सिक' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. याशिवाय पुढं तो 'माय नेम इज किराटका' आणि 'गूगली 2'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. ऐश्वर्या राय बच्चन मुलगी आराध्यासह कानमधून मुंबईत परतली, व्हिडिओ व्हायरल - CANNES 2024
  2. ज्युनियर एनटीआर स्टारर 'देवरा पार्टी 1'मधील 'फिअर' गाणं आज संध्याकाळी होणार रिलीज, पाहा पोस्ट - DEVARA PART 1
  3. 'जॉली एलएलबी 3'चं राजस्थानमधील शूटिंग पूर्ण होताच अक्षयचा दिलदारपणा, ५०० मुलींकरिता जाहीर केली मदत - jolly llb 3 Movie

Last Updated : May 19, 2024, 5:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.