मुंबई - Nita Ambani Classical Dance Performance : जागतिक श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट असलेले मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानीनं धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग इव्हेंटमध्ये खूप सुंदर परफॉर्मेंस दिला आहे. 1 ते 3 मार्च या कालावधीत मुकेश-अंबानी यांनी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा विवाहपूर्व काही सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यामध्ये शाहरुख खान, सलमान खान, रणबीर कपूर यांसारख्या बॉलीवूड सेलिब्रिटींपासून ते एमएस धोनी, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर यांसारख्या प्रसिद्ध क्रीडा जगतातील, विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली आहे.
अनंत आणि राधिकाची प्री-वेडिंग सेरेमनी : अनंत जुलै 2024 मध्ये बालपणीची मैत्रीण राधिका मर्चंटबरोबर लग्न करणार आहे. दरम्यान प्री-वेडिंग सेरेमनीमध्ये नीतानं शास्त्रीय नृत्य सादर करून सर्वांचे मनं जिंकले आहेत. नीताची होणारी सून राधिका देखील शास्त्रीय नृत्यामध्ये प्रविण आहे. अनंत आणि राधिकाचा प्री-वेडिंग इव्हेंट खूप भव्य आहे. जामनगर, गुजरात येथे आयोजित या भव्य कार्यक्रमात नीतानं 'विश्वंभरी स्तुती'वर अप्रतिम नृत्य सादर केलं होत. 'विश्वंभरी स्तुती'चं हे गीत आई अंबेला समर्पित आहे. नीता लहानपणापासून 'विश्वंभरी स्तुती'चे पठण करत आहे. नीतानं अनेक वेळा या गाण्यावर आपला परफॉर्मन्स दिला आहे.
नीता अंबानीनं शानदार नृत्य केलं सादर : नीता अंबानी अनेकदा नवरात्रीच्या वेळी, या गाण्यावर नृत्य करताना दिसते. नीतानं मुलगा अनंत आणि भावी सून राधिका यांच्यासाठी 'विश्वंभरी स्तुती' करून आई अंबेचा आशीर्वाद मागितला आहे. इतकंच नाही तर नीतानं तिचा हा परफॉर्मेंस अनेकांना आवडत आहे. या परफॉर्मन्सचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावर अनेकजण नीताचे कौतुक करताना दिसत आहे. अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी आमिर खान, कतरिना कैफ, विकी कौशल, वरुण धवन, अर्जुन कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, करिना कपूर, सैफ अली खान संजय दत्त यांच्यासह अनेक बॉलिवूड स्टार्स हजर होते. या भव्य कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा :