मुंबई - Nick Jonas And Malti Marie : देसी गर्ल प्रियांका चोप्रा' पती गायक निक जोनास आणि त्याची लाडकी मुलगी मालती मेरी हे नेहमीच चर्चेत असतात. आता निकनं सोशल मीडियावर 4 फेब्रुवारी रोजी मुलगी मालती मेरी जोनाससोबतचा सुंदर सेल्फी पोस्ट शेअर केली आहे. फोटोमध्ये मालती तिच्या वडिलांसोबत क्यूट स्टाइलमध्ये पोझ देताना दिसत आहे. निक आणि मालती यांच्या फोटोनं चाहत्यांची मने जिंकली आहेत. या पोस्टवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मालतीसोबतचा फोटो शेअर करताना निकनं पोस्टवर लिहिलं "एमएमनं (मालती मेरी) घेतलेला मॉर्निंग सेल्फी."
मालती मेरी जोनासचे मोहक फोटो व्हायरल : या फोटोवर चाहते मालती आणि निकवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. एका चाहत्यानं या फोटोवर कमेंट करत लिहिलं, ''मालतीचा हा खूप मोहक फोटो आहे, ती नेहमी सुंदर दिसते.'' यानंतर दुसऱ्यानं लिहिलं,''निक आणि मालती फोटोमध्ये खूप क्यूट दिसत आहेत.'' आणखी एकानं लिहिलं, ''मालती सुपर क्यूट आहे. तिचा सेल्फी हा खूप दमदार आहे''. अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत. या फोटोवर काहीजण हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे बॉलीवूड ते हॉलिवूडमधील सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. ते अनेकदा त्यांच्या मुलीचे गोंडस फोटो शेअर करतात.
जोनास ब्रदर्सचं मुंबईमधील पहिला कॉन्सर्ट : अलीकडेच निकनं मुंबईत कॉन्सर्ट केला. यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनीही हजेरी लावली. त्याच कॉन्सर्टमध्ये चाहत्यांनी 'जीजू-जीजू' म्हणत निकचं जल्लोषात स्वागत केले होते. निक आणि त्याच्या भावांनी भारतीय गायक किंगसोबत स्टेजवर एक रॉकिंग परफॉर्मन्स दिला. यानंतर चाहत्यांनी निकचं खूप कौतुक केलं. हा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामधील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जोनास ब्रदर्सचा हा भारतातील पहिला परफॉर्मन्स होता.
हेही वाचा :