ETV Bharat / entertainment

नीतू कपूरनं आलिया भट्ट आणि रणबीर कपूरला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा - ALIA RANBIR WEDDING ANNIVERSARY

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 14, 2024, 4:21 PM IST

Alia Ranbir Wedding Anniversary: बॉलिवूडचे पॉवरपॅक कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आज 14 एप्रिल रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे. यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाले असून या खास दिवशी नीतू कपूरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.

Alia Ranbir Wedding Anniversary
आलिया भट्टच्या लग्नाचा वाढदिवस

मुंबई - Alia Ranbir Wedding Anniversary: अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील पॉवरपॅक कपल्सपैकी एक आहे. या जोडप्यानं बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर 14 एप्रिल 2022 रोजी लग्नगाठ बांधली. 2022 मध्ये या जोडप्याला एक मुलगी झाली, जिचे नाव त्यांनी राहा ठेवलं. 14 एप्रिल 2024 रोजी आलिया आणि रणबीर त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहेत. दरम्यान या विशेष प्रसंगी रणबीरची आई-अभिनेत्री नीतू कपूरनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून या जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नीतू कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Alia Ranbir Wedding Anniversary
आलिया भट्टच्या लग्नाचा वाढदिवस

नीतू कपूर आलिया आणि रणबीरला दिल्या शुभेच्छा : नीतू कपूर अनेकदा आपल्या कुटुंबारबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नीतूनं रणबीर आणि आलियाचा फोटो शेअर करत इंस्टाग्राम स्टोरीच्या पोस्टमध्ये लिहिलं, ''आशीर्वाद.'' याशिवाय तिनं यावर दोन हार्ट इमोजी जोडले आहेत. नीतूनं शेअर केलेल्या फोटोमध्ये रणबीर आणि आलिया खूप सुंदर दिसत आहेत. या फोटोमध्ये हे जोडपे खूप खुश असून हात जोडून प्रार्थना करत आहे. दरम्यान या फोटोमध्ये आलिया भट्टनं ऑरेंज कलरच्या सूट आणि लांब कानातल्यांमध्ये घातले आहे. दुसरीकडे, रणबीर पांढऱ्या कुर्त्यामध्ये आहे. तसेच फोटोत आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या कपाळावर लाल तिलकही लावलेला आहेत.

आलिया आणि रणबीरचं वर्कफ्रंट : या जोडप्याचा हा फोटो पूजेदरम्यान क्लिक केला असल्याचा अंदाज लावला जाऊ शकतो. कुटुंबाव्यतिरिक्त, या जोडप्याला त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनेक चाहते आणि बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटीही शुभेच्छा देत आहेत. तसेचरणबीर कपूरच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर तो नितेश तिवारीच्या आगामी चित्रपट 'रामायण'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात तो श्रीरामची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय पुढं तो संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटात आलिया भट्टबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसेल. तसेच रणबीर हा 'ॲनिमल'च्या सीक्वेलवरही काम करत आहे. याशिवाय आलिया 'जिगरा'मध्ये वेदांग रैनाबरोबर दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा सलमान खानला फोन कॉल, सुरक्षेबाबत दिली मोठी माहिती - Salman Khan
  2. सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबारामागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात? पाचवेळा मिळालीय जीवे मारण्याची धमकी - salman khan
  3. अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर दोन अज्ञातांचा गोळीबार, लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीवर पोलिसांचा संशय - Salman Khan

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.