ETV Bharat / entertainment

नीतू कपूर यांनी 66वा वाढदिवस मुलगी रिद्धिमा कपूरसह स्वित्झर्लंडमध्ये केला साजरा - NEETU KAPOOR 66TH BIRTHDAY - NEETU KAPOOR 66TH BIRTHDAY

Neetu kapoor birthday : नीतू कपूर आज 66वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांची मुलगी रिद्धिमा कपूरनं त्यांच्या वाढदिवसामधील फोटोरुपी झलक इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

Neetu kapoor birthday
नीतू कपूरचा वाढदिवस (riddhima kapoor - instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 8, 2024, 5:13 PM IST

मुंबई - Neetu kapoor birthday : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर आज 8 जुलै रोजी 66 वर्षांच्या झाल्या आहेत. त्यांचा वाढदिवस एका खास पद्धतीनं साजरा करण्यात आला आहे. सध्या त्या भारतात नसून स्वित्झर्लंडमध्ये आहेत. नीतू कपूर यांचा मध्यरात्री वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला गेला. आता त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या वाढदिवसाच्या पार्टीत राहा कपूर, रणबीर कपूर आणि आलिया भट दिसले नाहीत. समोर आलेल्या फोटोंमध्ये, नीतू कपूर या वाढदिवस तीन खास लोकांबरोबर साजरा करत आहेत. या फोटोंमध्ये नीतू कपूर या मुलगी रिद्धिमा कपूर, जावई भरत साहनी आणि नात समारा साहनीबरोबर दिसत आहे.

नीतू कपूर यांनी स्वित्झर्लंडमध्ये केला वाढदिवस साजरा : रिद्धिमा कपूरनं आपल्या आईचा वाढदिवस खास बनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. आता रिद्धिमानं सोशल मीडियावर वाढदिवसाची झलक पोस्ट केली आहे. या व्हिडिओत नीतू कपूर खूप आनंदी दिसत असून केक कापण्यापूर्वी कुटुंबाबरोबर हॅपी बर्थडे गाणे गात आहे. याशिवाय दुसऱ्या एका फोटोमध्ये नीतू, रिद्धिमा आणि समारा यांची चांगली बाँडिंगही पाहायला मिळत आहे. नीतू कपूर यांचा अंदाज अनेकांना आवडत आहे. आता अनेक चाहते त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नीतू कपूरच्या वाढदिवसाला अनुपस्थित: दरम्यान आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये व्यग्र आहेत. अंबानी कुटुंबातील हे लग्न 3 दिवस चालणार आहे. यामुळे दोघेही नीतू कपूरच्या वाढदिवसाला उपस्थित राहू शकला नाही. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या अनुपस्थितीमुळे राहाही वाढदिवसाला उपस्थित राहू शकली नाही. नीतू कपूर यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटामध्ये काम केलंय. यामध्ये 'दुसरा आदमी' 'रफू चक्कर', 'कभी-कभी', 'अमर अकबर अँथनी' या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय नीतू यांची जोडी ऋषी कपूरबरोबर ऑन-स्क्रीन खूप हिट होती.

हेही वाचा :

  1. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यातील जस्टिन बीबरनं शेअर केले खास फोटो आणि व्हिडिओ - Anant Radhika Sangeet Nigh
  2. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाचा 'संगीत सोहळा' संपन्न - sangeet ceremony

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.