ETV Bharat / entertainment

आराध्या बच्चनबद्दल आत्येबहीण नव्या नवेलीची भन्नाट प्रतिक्रिया, पॉडकास्टमध्ये केलं नव्या पिढीचं गुपित उघड... - Navya Nanda talk about Aaradhya - NAVYA NANDA TALK ABOUT AARADHYA

Navya Naveli Nanda : अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदानं एका मुलाखतीत मामेबहीण आराध्याबद्दल एक खुलासा केला आहे. आता याबद्दल जाणून घेण्यासाठी बातमी वाचा...

Navya Naveli Nanda
नव्या नवेली नंदा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 17, 2024, 6:19 PM IST

मुंबई - Navya Naveli Nanda : हिंदी चित्रपटसृष्टीचा दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदानं फार कमी वेळात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नव्या चित्रपटसृष्टीपासून थोडी लांब राहाते. त्यामुळे तिनं आजपर्यंत कुठल्याचं चित्रपटांमध्ये काम केलं नाही. मात्र ती अनेकदा बॉलिवूडमधील इतर काही स्टार्स किडबरोबर पार्टी करताना दिसते. ती अनेकदा आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. याशिवाय ती एक यशस्वी बिझनेस वुमन आहे. नव्या सध्या आपल्या वडिलांबरोबर व्यवसाय सांभाळत आहे.

नव्या नवेली नंदानं केला आराध्याबद्दल खुलासा : नव्या सध्या तिच्या पॉडकास्ट शो 'व्हॉट द हेल नव्या'च्या दुसऱ्या सीझनमुळेही चर्चेत आहे. या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये नव्याची आजी जया बच्चन आणि तिची आई श्वेता बच्चन आल्या होत्या. आता नुकतीच ती एका मुलाखतीत मामेबहीण आराध्या बच्चनबद्दल बोलताना दिसली. या मुलाखतीत नव्याला विचारण्यात आलं की, 'तिला तिच्या लहान बहिणीला काही सल्ला द्यायचा आहे का?' यावर तिनं उत्तर दिलं, 'आराध्या तिच्या वयात माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे. आजची मुलं आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत. तिच्या वयात मी तितकी हुशार नव्हते. मला वाटतं की आजची आपली संपूर्ण पिढी खूप कुशाग्र आहेत आणि त्यांना जग बदलायचं आहे.'

नव्या नवेली नंदाबद्दल : पुढं नव्यानं म्हटलं, 'मी आराध्याला काय सल्ला द्यायला पाहिजे हे मला कळत नाही. मी स्वतः तिच्याकडून खूप काही शिकत असते. ती प्रत्येक गोष्टीबद्दल खूप जागरूक आहे, ती खूप जास्त हुशार आहे. मला एक लहान बहीण आहे तिच्याशी मी काही गोष्टी शेअर करू शकते, याबद्दल मला खूप चांगलं वाटतं. नव्या अनेकदा तिच्या बिजनेस टूरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ती तिच्या बिजनेसविषयी खूप जागरुक आहे. दुसरीकडे आराध्या ही तिच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधील झालेल्या कार्यक्रमामुळे चर्चेत आली होती. या कार्यक्रमात तिनं नाटकामध्ये खूप सुंदर अभिनय केला होता. यानंतर अनेकजण ती खूप चांगली अभिनेत्री होईल असं म्हणत होते.

हेही वाचा :

  1. जान्हवी कपूर कपूरचा अनोखा अवतार, 'उलझ' अ‍ॅक्शन पॅक्ड टीझर रिलीज - Janhvi Kapoor
  2. गर्भवती दीपिका पदुकोणचा 'सिंघम अगेन'च्या सेटवरील फोटो झाला व्हायरल - deepika padukone
  3. दुबईत पावसाचा कहर! पाहा, गायक राहुल वैद्यनं शेअर केलेला भीषण पुराचा व्हिडिओ - rahul vaidya

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.