ETV Bharat / entertainment

मुस्कान पाठोपाठ नायरा 'बिग बॉस' हाऊसमधून बाहेर, तर विव्हियन ठरला काळ्या हृदयाचा व्यक्ती - BIGG BOSS 18

Bigg Boss 18 : बिग बॉस 18 मधून आठवड्यात दोन स्पर्धक बाहेर पडले. आधी मुस्कान आणि आता नायरा बॅनर्जीला बाहेरचा रस्ता पकडावा लागला आहे.

Bigg Boss 18
बिग बॉस 18 (Big Boss 18 team))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 28, 2024, 1:14 PM IST

मुंबई - बिग बॉस 18च्या या वीकेंडच्या एपिसोडमध्ये अजय देवगण आणि रोहित शेट्टी 'सिंघम अगेन'चे प्रमोशनसाठी आले होते. या आठवड्यात कोणत्या स्पर्धकाला घरातून बाहेर जावं लागणार याची घोषणा सलमान खाननं नाही तर रोहित शेट्टीने केली. बिग बॉसच्या घरातून एका स्पर्धकाला बेगोर जावं लागण्याबरोबरच स्पर्धकांमध्ये भरपूर ड्रामा पाहायला मिळाला.

या आठवड्यात रजत दलाल, विव्हियन डिसेना, नायरा बॅनर्जी आणि अविनाश मिश्रा हे चार स्पर्धक नॉमिनेट झाले होते. रोहित शेट्टी बिग बॉसच्या घरात आला आणि म्हणाला की, सलमान खाननं त्याला या आठवड्यात घरातून काढून टाकलेल्या व्यक्तीचं नाव उघड करण्याची जबाबदारी दिली आहे. असं म्हणत त्यानं सर्वात कमी मतं मिळालेली स्पर्धक म्हणून नायरा बॅनर्जीचं नाव घेतलं. रोहित म्हणतो, या घरात शेवटचा दिवस नायरा बॅनर्जी हिचा आहे, तिला सर्वात कमी मते मिळाली आहेत.

एका आठवड्यात दुसऱ्यांदा स्पर्धकाला दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता - नायरा बॅनर्जीला सर्वात कमी मतं मिळाली. आपल्याला कमी मतदान होणार याची कल्पना होती, असं तिनं म्हटलं. या आठवड्याच्या सुरुवातीला ‘अनुपमा’ फेम अभिनेत्री मुस्कम बामणे शोमधून बाहेर पडली होती. बिग बॉसमधील इतर स्पर्धकांना वाटत होतं की मुस्कान या घरात निश्क्रिय आहे. तिच्याकडून कुठल्याचं हालचाली होत नाहीत किंवा शोमध्ये तिचं काहीच योगदानही नाही. त्याच वेळी सलमान खानने घोषणा केली होती की या आठवड्यात 'वीकेंड का वार' या शोमध्ये आणखी एक एलिमिनेशन होणार आहे.

विव्हियन ठरला काळ्या काळजाचा व्यक्ती - बिग बॉसच्या घरात झालेल्या ड्रामानंतर बिग बॉसनं विव्हियन डिसेना आणि करणवीरला एकत्र बोलावलं आणि त्यानंतर घरातील सदस्य दोन गटात विभागले गेले. बिग बॉसने सर्वांना विचारले की दोघांपैकी कोणाचे हृदय सर्वात जास्त काळे आहे. यासाठी सर्वांनी विव्हियनला सर्वाधिक मतं दिली. अशा प्रकारे विव्हियन ब्लॅक-हार्टेड गेम जिंकला. पण यातून सिद्ध झालं की तोच सर्वात जास्त काळ्या हृदयाचा व्यक्ती आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.