ETV Bharat / entertainment

'बिग बॉस सीझन 18'मधून मुस्कानला बाहेरचा रस्ता, राशनसाठी नायरा आणि अ‍ॅलिसमध्ये वाद - BB18

'बिग बॉस सीझन 18'मध्ये राशनसाठी घरातील सदस्य हे त्याग करताना दिसणार आहे. राशन हे अविनाश आणि अरफीन घरातील सदस्यांना देतील.

बिग बॉस सीझन 18
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 25, 2024, 10:22 AM IST

मुंबई - 'बिग बॉस सीझन 18'मधील स्पर्धकातील संघर्ष वाढत चाललाय. राशन आणि इतर साहित्यावर जेलमध्ये असलेल्या अविनाश आणि तजिंदरचा अधिकार आहे. राशन मागण्यासाठी आलेल्या स्पर्धकांना अविनाशच्या खडूसपणाचा सामना पुन्हा करावा लागला. यामध्ये अनेकांचा डोळ्यातून अश्रूही आले. तर 'बिग बॉस'च्या लेटेस्ट प्रोमोमध्ये मुस्कानला घराबाहेर पडावं लागणार हे निश्चित झालंय मुस्कानसह सारा आणि तजिंदरलाही एलिमिनेशनचा सामना करावा लाागला आहे.

अविनाश आणि अरफीन देईल घरातील सदस्यांना राशन : काल पार पडलेल्या एपिसोडमध्ये, अविनाश आणि अरफीन यांना राशनच्या बदल्यात कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या आवडत्या वस्तूंचा त्याग करण्याची संधी मिळाली. यावेळी ईशानं आईची शाल अर्पण करून पीठ घेतलं. तर शिल्पाला तिच्या पती आणि मुलाचे फोटो टाकून काही वस्तू मिळवाव्या लागल्या होत्या. आता, आगामी भागात एका स्पर्धकाला बाहेर काढले जाणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

अ‍ॅलिस करते राशनसाठी त्याग : 'बिग बॉस 18'च्या लेटेस्ट प्रोमोमध्ये,अ‍ॅलिस रेशनसाठी आपल्या वस्तुंचा त्याग करण्यासाठी जाते, पण तिला ईशा आडवते. याबदल्यात त्याला अविनाश काहीही देणार नाही असं सांगते. अविनाश त्याच्या मर्जीतल्या लोकांनाच राशन देत असल्याचा आरोप यावेळी नायरानं केला. शिल्पा आणि अ‍ॅलिसनंही अशीच भूमिका घेतली. अ‍ॅलिसनं नायराला असं काही न बोलण्यास आणि शांत राहण्यास सांगितलं. पण हट्टाला पेटलेली अ‍ॅलिसनं आपलं तोंड सुरुच ठेवलं. दरम्यान बिग बॉसनं राहत्या भागातील सर्व हाऊसमेट्सना बोलावलं आणि तीनपैकी एकाची एक्स्पायरी डेट लवकर सांगण्यास सांगितलं.

सारा, तजिंदर आणि मुस्कान यांच्यावर संकट : बिग बॉसनं सांगितलं की, सारा, तजिंदर आणि मुस्कान यापैकी एकाची वेळ संपणार आहे. त्यानंतर घरातील सदस्यांना कोणाला बाहेर काढायचे आहे हे ठरवण्याचे आदेश देण्यात आले. या घडामोडीत करण मुस्कानच्या कपाळावर एक स्टिकर चिकटवतो आणि म्हणतो की ती बहुतेक लॉस्ट झाली आहे. चाहत पांडेनं सांगितलं की, मुस्कानचा कोणत्याही प्रसंगी एकही स्टँड दिसत नव्हता. अविनाशने ते वैयक्तिक असल्याचे सांगितले आणि त्यानं याबद्दल साराला विचारले. विवियननं तजिंदरला फटकारले आणि सांगितलं की ती मत मांडते पण ऐकलं जात नाही. ते फक्त चहा आणि राजकारणावरच चर्चा झडतात. यानंतर सर्वाधिक मतं मुस्कानच्या विरोधात जातात. अशा परिस्थितीत तिला शोमधून बाहेर काढलं जाणार आहे.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस १८'मध्ये अरफीन खानची पत्नी सारावर एलिमिनेशनची टांगती तलवार
  2. श्रृतिका ठरली बिग बॉसच्या घरात लाडली, मुस्कानवर बाहेर होण्याची टांगती तलवार
  3. आश्वासनांचा पाऊस पडूनही निवडणुकीचा धक्कादायक निकाल, सत्तेपासून 'दलाल' वंचित !

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.