ETV Bharat / entertainment

ऑस्कर म्युझियममध्ये गर्जणार भारतीय सिनेमाचं संगीत, 'आरआरआर' आणि 'लगान' उडवणार खळबळ - Indian Cinema Music at Oscar Museum - INDIAN CINEMA MUSIC AT OSCAR MUSEUM

Indian Cinema Music at Oscar Museum : अकादमी म्युझियम ऑफ मोशन पिक्चर्स भारतीय सिनेमा आणि म्यूझिक सेलेब्रिशन साजरे करण्याची तयारी करत आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत 'आरआरआर', 'स्लमडॉग मिलेनियर' आणि 'लगान' यासारख्या चित्रपटांच्या संगीताचा उत्सव साजरा करण्यासाठी एका कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.

Indian Cinema Music at Oscar Museum
ऑस्कर म्युझियममध्ये भारतीय सिनेमाचं संगीत (RRR and Lagan poster)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 9, 2024, 5:58 PM IST

Updated : May 10, 2024, 9:16 AM IST

लॉस एंजेलिस - Indian Cinema Music at Oscar Museum : कला, विज्ञान आणि चित्रपट निर्मितीमधील कलाकारांना समर्पित असलेले अकादमी म्युझियम ऑफ पिक्चर्स भारतीय चित्रपट आणि म्यूझिक साजरे करण्यासाठी सज्ज झालं आहे. अकादमी संग्रहालयाने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे 'आरआर' (2022), 'स्लमडॉग मिलेनियर' (2008), आणि 'लगान' (2001) च्या संगीताचा उत्सव साजरा करण्यासाठी कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

या दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे

तिन्ही चित्रपटांचे पोस्टर शेअर करण्याबरोबर कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'शनिवार, 18 मे रोजी संध्याकाळी 6:30 वाजता, आपण आरआरआर (2022), लगान (2001), 'स्लमडॉग मिलेनियर' (2008) ) चे महान संगीत साजरं केलं जाणार आहे. 18 मे रोजी सायंकाळी 6:30 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात बॉलिपॉप आणि सदूबांचा थेट तबला आणि नृत्य सादरीकरणाचा समावेश होईल. या कार्यक्रमामध्ये तिन्ही चित्रपटांचे संगीत सादर केले जाईल. विशेष म्हणजे एसएस राजामौली यांच्या राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांची भूमिका असलेल्या 'आरआरआर' मधील 'नाटू नाटू' या ट्रॅकने अकादमी पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट मूळ पुरस्कार जिंकला होता.

स्लमडॉग मिलेनियरनेही जिंकले होते अनेक ऑस्कर पुरस्कार

आमिर खानची भूमिका असलेल्या 'लगान' या चित्रपटाची कथा ही ब्रिटिश राजवटीमध्ये जुलमी करांच्या ओझ्याखाली दबलेल्या गावाची कथा आहे. तर भारताच्या झोपडपट्टीतील मुलाची गोष्ट असलेल्या कथेवर आधारित 'स्लमडॉग मिलेनियर'मध्ये अनिल कपूर, दिवंगत अभिनेता इरफान खान, देव पटेल आणि फ्रीडा पिंटो यांच्यासह अनेक कलाकार होते. या चित्रपटाने 2009 मध्ये अनेक ऑस्कर जिंकले होते. यामध्ये डॅनी बॉयल सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन, तर संगीतकार ए आर रहमान यांना 'जय हो' गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी ऑस्कर मिळाला होता.

हेही वाचा -

  1. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचा व्हिडिओ व्हायरल, कॅमेरा बघताच केलं 'हे' कृत्य - Deepika Padukone and Ranveer Singh
  2. सलमान खानच्या 'सिकंदर' शूटिंग सेटवरील व्हायरल फोटोमुळे चाहते संभ्रमात - Salman Khan
  3. दिग्दर्शक संगीत सिवन यांचे 61 व्या वर्षी निधन, सेलेब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली - Sangeet Sivan passes away

Last Updated : May 10, 2024, 9:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.