ETV Bharat / entertainment

झलक दिखला जा 11 स्पर्धा; मनीषा राणीनं मारली बाजी, म्हणाली "स्वप्न सत्यात उतरलं" - झलक दिखला 11 स्पर्धा

Jhalak Dikhhla Jaa S11 : झलक दिखला जा या रियालिटी शोचा अंतिम सोहळा शनिवारी रात्री पार पडला. या सोहळ्यात मनीषा राणी हिनं अंतिम फेरीत बाजी मारली. मनीषाला 30 लाख रुपये आणि 'झलक दिखला जा' ट्रॉफी भेट देण्यात आली.

Jhalak Dikhhla Jaa S11
मनीषा राणीनं मारली बाजी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 3, 2024, 8:49 AM IST

Updated : Mar 3, 2024, 9:31 AM IST

मुंबई Jhalak Dikhhla Jaa S11 : देशभरातील तरुणाईत धुमाकूळ घालणाऱ्या झलक दिखला जा 11 स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी पार पडली. झलक दिखला जा 11 सिझनची मनीषा राणी ही विजेता ठरली. मनीषा राणीनं वाइल्डकार्ड प्रवेशिकेनं झलक दिखला जा 11 स्पर्धेत प्रवेश केला होता. मनीषा राणीला विजयी ट्रॉफीसह 30 लाख रुपयांचा धनादेश मिळाला. तर तिचे कोरिओग्राफर आशुतोष पवार यांना 10 लाख रुपये देण्यात आले. या दोघांनी अबुधाबीच्या 'यास' बेटाची सहलही जिंकली आहे. यावेळी बोलताना मनीषा राणीनं "स्वप्न सत्यात उतरलं," अशी प्रतिक्रिया दिली.

मनीषा राणी 'झलक दिखला जा' ची विजेता : झलक दिखला जा 11 स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी रात्री पार पडली. या अंतिम फेरीला 'मर्डर मुबारक'च्या कलाकारांनी उपस्थिती लावली. यात सारा अली कान, विजय वर्मा आणि संजय कपूर यांचा समावेश होता. या कलावंतांनी झलक दिखला जा च्या अंतिम फेरीत जोरदार नृत्य केलं. झलक दिखला जा 11 स्पर्धेता मनीषा राणी, शोएब इब्राहिम, धनश्री वर्मा, अद्रिजा सिन्हा आणि श्रीरामा चंद्रा या स्पर्धकांचा समावेश होता. यात मूंगेर इथल्या मनीषा राणी हिनं झलक दिखला जा 11 स्पर्धेचा मुकूट पटकावला.

'झलक दिखला जा'च्या स्पर्धकांनी या गाण्यांवर धरला ठेका : झलक दिखला जा 11 स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्पर्धकांनी आपल्या धडाकेबाज नृत्यानं मोठा धुमाकूळ घातला. यात झलक दिखला जा 11 स्पर्धा जिंकणाऱ्या मनीषा राणी हिनं 'ठुमकेश्वरी', 'डू यू लव्ह मी', 'परम सुंदरी' आणि 'सामी सामी' या गाण्यांवर दिलखेचक नृत्य केलं. तर शोएबनं शाहरुख खानच्या जवान चित्रपटातील 'जिंदा बंदा' या गाण्यावर धडाकेबाज नृत्य सादर करत प्रेक्षकांना भुरळ घातली. त्यानंतर शोएबनं बादशाह या शाहरुख खान आणि ट्विंकल खन्ना यांच्या सुप्रिसद्ध चित्रपटातील 'बादशाह ओ बादशाह' या गाण्यावर भन्नाट नृत्य केलं.

कोण आहे मनीषा राणी : मनीषा राणी हिनं झलक दिखला जा 11 ची स्पर्धा जिंकली आहे. मनीषा राणी ही बिहारमधील मूंगेर इथली सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आहे. मनीषा राणी हिनं वाईल्ड कार्ड एन्ट्रीनं झलक दिखला जा सिझन 11 मध्ये प्रवेश केला आहे. हा प्रवास स्वप्नपूर्ती पेक्षा कमी नाही. मी हे सगळं स्पर्धेचे जज, प्रेक्षकांच प्रेमाच्या जोरावर मिळवलं. हा अनुभव माझं आयुष्य बदलणार आहे. वाईल्ड कार्ड एन्ट्रीनं मी स्पर्धेत आले, मात्र त्यासाठी मला दुप्पट मेहनत करावी लागली. दुप्पट मेहनत केल्यानंच मी स्वत:ला सिद्ध करू शकले, असं तिनं यावेळी स्पष्ट केलं. मनीषानं यापूर्वी 'बिग बॉस ओटीटी 2' वर द्वितीय उपविजेतेचं पारितोषिक पटकावलं होतं.

हेही वाचा :

  1. ''मीडियाने माझ्या लग्नाची तारीख जाहीर करण्यापूर्वी...,'' म्हणत क्रितीने केला प्रभाससोबत डेटिंगचा खुलासा
  2. जबरदस्त परफॉर्मन्सनंतर रिहाना मायदेशी रवाना, भारतात परतण्याची व्यक्त केली इच्छा
  3. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला धोनीसह 'या' दिग्गज खेळाडूंची हजेरी, वाचा कोण कोण उपस्थित

Last Updated : Mar 3, 2024, 9:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.