ETV Bharat / entertainment

'बिग बॉस 17' चा विजेता मुनव्वर फारुकीवर फेकली अंडी; पोलिसांनी आरोपीला बजावली नोटीस - Munawar Faruqui

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 11, 2024, 8:02 AM IST

Munawar Faruqui : 'बिग बॉस 17' चा विजेता मुनाव्वर फारुकी त्यांच्या दुकानात दिसल्यानं नाराज झालेल्या दुसऱ्या हॉटेलच्या लोकांनी त्याच्यावर अंडी फेकून गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना कायदेशीर नोटीस बजावलीय.

Munawar Faruqui
'बिग बॉस 17' चा विजेता मुनव्वर फारुकीवर फेकली अंडी; पोलिसांनी बजावली नोटीस

मुंबई Munawar Faruqui : 'बिग बॉस 17' चा विजेता मुनाव्वर फारुकी त्यांच्या दुकानात दिसल्यानं नाराज झालेल्या दुसऱ्या हॉटेलच्या लोकांनी त्याच्यावर अंडी फेकून गोंधळ घातला. दुसऱ्या हॉटेलच्या लोकांनी त्याच्यावर अंडी फेकून गोंधळ घातल्याचीची तक्रार एका मिठाईच्या दुकान मालकानं पायधुनी पोलिसांकडे केलीय. त्यामुळं पायधुनी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दुसऱ्या हॉटेल चालक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावलीय.

दुकानावर घातला गोंधळ : पायधुनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फारुकी मंगळवारी उशिरा रात्री मिनार मशीदजवळील, मोहम्मद अली रोड इथं इफ्तार पार्टीत सहभागी झाला होता. मुनव्वर फारुकी यानं मिनारा मशिदीजवळील नूरानी मिठाईच्या दुकानाला भेट दिली. तिथे त्याला पाहण्यासाठी चाहते जमले होते. मात्र या मिठाईच्या दुकानावर अचानक अंडी फेकण्यात आली. त्यामुळं काही लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दुकान मालक अख्तर नूरानी यांनी पायधुनी पोलिसात तक्रार दाखल केली. सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका व्हिडिओमध्ये त्याचे चाहते मोठ्या गर्दीत गोंधळ घालताना दिसले आहेत.

आरोपींना बजावली नोटिस : नूरानी हॉटेलचे मालक अखतर नूरानी यांनी केलेल्या आरोपात असं म्हटलंय की, शेजारील हॉटेल मालक आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी मुनव्वर फारुकी यांच्यावर अंडी फेकली. तसेच शिवीगाळ केली. कारण फारुकी यानं त्यांच्या हॉटेलला भेट दिल्यानं ते नाराज होते. या तक्रारीनुसार पायधुनी पोलिसांनी सात जणांवर दंगल करणे, धमक्या आणि बेकायदेशीर सभा यासह अनेक कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यातील सर्व सात जणांना फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कलम 41 अ अंतर्गत नोटीस बजावण्यात आल्याचं पायधुनी पोलिसांनी सांगितलं. फारुकीची एक झलक पाहण्यासाठी मंगळवारी मोहम्मद अली रोडवर चाहत्यांची तोबा गर्दी झाली होती. फारुकीही गर्दीतून वाट काढताना सोशल मीडियातील व्हिडिओत दिसून आला होता. या वेळी तो हैराण झाल्याचं दिसत होता.

हेही वाचा :

  1. मुनाव्वर फारुकीचे सेलिब्रेशन टिपण्यासाठी ड्रोनचा बेकायदेशीरपणे वापर; पोलिसांकडून ड्रोन ऑपरेटरवर गुन्हा दाखल
  2. 'बिग बॉस 17' विजेता मुनावर फारुकी आणि हिना खानचे फोटो व्हायरल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.