लखनऊ Woman Allegation On Ravi Kishan : सुप्रसिद्ध अभिनेते तथा गोरखपूरचे खासदार रवी किशन शुक्ला यांच्यावर मुंबईतील महिलेनं गंभीर आरोप केले आहेत. "अभिनेते रवीकिशन यांच्याशी आपलं लग्न 25 वर्षापूर्वी लग्न झालं असून त्यांच्यापासून आपल्याला एक मुलगी आहे," असा आरोप या महिलेनं लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेऊन केला. यावेळी या महिलेनं तिच्या मुलीचे फोटो दाखवून रवीकिशन यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. "अभिनेता रवी किशन यांच्याविरोधात न्यायालयात जाण्याचंही" या महिलेनं यावेळी स्पष्ट केलं आहे. मात्र अद्याप अभिनेता रवी किशन यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
पत्रकार महिलेसोबत 1996 मध्ये केलं लग्न : मुंबईतील या महिलेनं सोमवारी लखनऊ इथं पत्रकार परिषदे घेतली. या महिलेनं पत्रकार परिषदेत खासदार तथा अभिनेता रवी किशन यांच्यावर गंभीर आरोप केले. "1995 मध्ये मी मुंबईत पत्रकार म्हणून काम करत होते. यावेळी मी एका कार्यक्रमाला गेली होती. तिथं माझी भेट रवी किशन यांच्याशी झाली. तेव्हापासून दोघं एकत्र होतो. 1996 मध्ये रवी किशन यांनी कुटुंब आणि मित्रांसमोर मंगळसूत्र आणि सिंदूर लावून माझ्याशी लग्न केलं. हे लग्न मुंबईतच पार पडलं. रवी किशन आणि मला एक मुलगी आहे. आता मुलीला तिचा हक्क मिळवून देण्यासाठी मी न्यायालयात जाणार आहे," असा दावा या महिलेनं केला आहे.
मुलीच्या हक्कासाठी जाणार न्यायालयात : "रवी किशन यांनी मागील 25 वर्षापासून ही बाब लपवून ठेवली. त्यांनी आपल्या मुलीला हक्क देण्याबाबत कधीच काही बोलले नाहीत. रवी किशन यांनी आपल्या मुलीसाठी काहीतरी केलं पाहिजे असं वारंवार सांगितलं. मात्र अद्यापही काही केलं नाही. गेलं वर्षभर त्यांनी बोलणंही बंद केलं. त्यामुळे मला आता कायदेशीर कारवाई करावी लागणार आहे. मी माझ्या मुलीच्या हक्कासाठी लढणार आहे. रवी किशन यांच्या आग्रहामुळे शाळेतही मुलीच्या वडिलांचं नाव लिहलं जात नव्हतं. वडिलांचं नाव लिहलं तर लोकांना कळेल," असं त्यांना वाटत होतं, असं या महिलेनं सांगितलं.
ना वडिलांचं प्रेम मिळालं ना कोणती मदत : या महिलेसोबत आलेल्या मुलीनंही यावेळी खासदार रवी किशन यांच्यावर हल्लाबोल केला. "मला कधीच माझ्या वडिलांचं प्रेम मिळालं नाही. ते घरी यायचे, आम्ही त्यांना भेटायचो, मात्र ते थोड्याच वेळात निघून जायचे. जास्त दिवस ते थांबायचे नाहीत. मी त्यांच्याशी अनेकदा बोलली, मात्र त्यांनी कधीच मला मदत केली नाही. मागच्या वेळी मला दहा हजाराची मदत हवी होती, मात्र त्यांनी मला पैसे दिले नाही. मी त्यांना चित्रपटात येण्याविषयी बोलले. मात्र त्यांनी मला त्याबाबतही मदत केली नाही. मी अभिनेत्री लारा दत्तासोबत एक चित्रपट केला. मात्र या चित्रपटासाठी मला ऑडिशन द्यावी लागली. माझ्या वडिलांनी मला कोणतीही मदत केली नाही," असं या मुलीनं यावेळी सांगितलं.
हेही वाचा :