ETV Bharat / entertainment

तरुणाईच्या समस्या मांडणाऱ्या 'विषय हार्ड' चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च - Vishay Hard Motion poster - VISHAY HARD MOTION POSTER

Vishay Hard Motion poster : नव्या विषयावरील एक मनोरंजक चित्रपट घेऊन सुमित पदार्पण करण्यासाठी सज्ज झालाय. सुमितनंच या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय. इतकंच नाही तर या चित्रपटात तो पर्ण पेठेबरोबर अभिनयही करत आहे. 'विषय हार्ड' असं शीर्षक असलेला हा चित्रपट येत्या जुलै महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Motion poster launch
'विषय हार्ड' चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च (Vishay Hard poster)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 17, 2024, 4:51 PM IST

मुंबई - Vishay Hard Motion poster : मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार कामगिरी करताना दिसतात. आता एक नवीन मराठी चित्रपट येऊ घातलाय ज्याचे नावंच आहे 'विषय हार्ड. हा एक युथ सेंट्रिक सिनेमा असून यातून तरुणाईच्या समस्या मांडण्यात आल्या आहेत. नवोदित अभिनेता सुमित या चित्रपटातून पदार्पण करीत असून सुस्वरूप आणि प्रतिभावान अभिनेत्री पर्ण पेठे त्याच्यासोबत दिसेल. 'चल... चल... चल... पळ... पळ... पळ..., कोण पळतंय पुढे?' असं म्हणत दिसणारं 'विषय हार्ड' चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'विषय हार्ड'मधून ग्रामीण आणि शहरी या दोन्ही प्रकारच्या प्रेक्षकांचे मनोरंजन होईल, हा प्रयत्न दिग्दर्शकानं केला आहे. यातील कन्टेन्ट फ्रेश असून मोशन पोस्टरमध्ये एका रस्त्यावर एका मागोमाग एक धावणारी माणसं दिसताहेत आणि चित्रपटाचं शीर्षक येण्याअगोदर सर्वात पुढे असलेल्या बाईकवर एक तरुण जोडपं बसलेलं दिसत आहे आणि पुढे 'पुढे रस्ता बंद आहे', असं लिहिलेला फलक दिसतो आहे. राज्यातील आणि ग्रामीण निमशहरी भागांतील राजकारण आणि त्यात भरडला जाणारा आजचा युवक यातून निर्माण होणारा संघर्ष चित्रपटातून अधोरेखित होईल.

Motion poster launch
'विषय हार्ड' चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च (Vishay Hard poster)

'विषय हार्ड' या चित्रपटाची निर्मिती बर्डबॅाय एन्टरटेन्मेंट आणि कोल्हापूर टॅाकिज यांनी केली असून निर्माते आहेत गीतांजली सर्जेराव पाटील, सर्जेराव बाबूराव पाटील आणि सुमित पाटील. चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या सुमित यांनीच कथा लिहिली आहे. चित्रपटाची पटकथा व संवादलेखन दिग्दर्शक सुमित आणि दिपक भिकाजी माडकेर यांनी केलेलं असून
नंदकुमार गोरुले, सुदर्शन खोत, साहिल कुलकर्णी, सुमित पाटील, रिषभ पाटील, विशाल सदाफुले यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे साहिल कुलकर्णी यांनी. पर्ण पेठे आणि सुमित या नव्या कोऱ्या जोडीसोबत हसन शेख, नितीन कुलकर्णी, विपीन बोराटे, प्रताप सोनाळे, भूमी पाटील, चैत्राली इनामदार, आनंद बल्लाळ आदी कलावंतही महत्वपूर्ण भूमिकांतून दिसतील.

येत्या जुलैमध्ये 'विषय हार्ड' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा -

  1. 'चंदू चॅम्पियन'मध्ये दिसणार सलग 8 मिनिटांच्या सिंगल टेक वॉर सिक्वेन्सची झलक, ट्रेलरची उलटी गिनती सुरू - Chandu Champion trailer
  2. रश्मिका मंदान्नाच्या अटल सेतू व्हिडिओची पंतप्रधान मोदींकडून दखल, पेड प्रचाराचा युजर्सकडून आरोप - Rashmika Atal Setu Video
  3. कान्स 2024च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय बच्चनचा जलवा, मुलगी आराध्यानंही जिंकली मनं - Cannes 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.