ETV Bharat / entertainment

मदर्स डेनिमित्त बॉलिवूड ते साऊथमधील 'या' सेलिब्रिटींनी त्यांच्या आईवर केला प्रेमाचा वर्षाव - Mothers Day 2024 - MOTHERS DAY 2024

Mothers Day 2024: बॉलिवूडपासून तर साऊथ इंडस्ट्रीपर्यंतच्या सेलिब्रिटींनी आपल्या आईंना मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या स्टार्सनी त्यांच्या आईबरोबरचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 12, 2024, 2:52 PM IST

मुंबई - Mothers Day 2024 : आज 12 मे रोजी जगभरात मदर्स डे साजरा केला जात आहे. या खास दिवशी चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्सनं काही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. रकुल प्रीत सिंग, टायगर श्रॉफ, बिपाशा बसू, राम चरणची पत्नी उपासना यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रकुल प्रीत सिंग : मदर्स डेच्या दिवशी, अभिनेत्री रकुल प्रीतनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आई आणि सासूबरोबरचे काही फोटो कोलाज करून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिनं सुंदर कॅप्शन देखील दिलंय. रकुलनं पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, "आई आणि सासू माझ्या आयुष्यात तुम्ही दोघी मिळाल्यानं मला खूप आनंद झाला आहे. तुम्ही दोघेही रॉकस्टार आहात. मम्मा, तू माझ्यासाठी नेहमीच उपस्थित राहिली आहेस, मला मार्गदर्शन केलं आहे आणि चांगल्या आणि वाईट काळात मला साथ दिली आहेस. तुमचे प्रेम आणि पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे."

Mothers Day 2024
मदर्स डे (उपासना कामिनेनी की इंस्टाग्राम स्टोरी (@upasanakaminenikonidela Instagram))

उपासना कामिनेनी कोनिडेला : साऊथ स्टार राम चरणची पत्नी उपासनानं एक सुंदर व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक पेटिंग दिसत यावर हॅप्पी मदर्स डे लिहिलं आहे.

Mothers Day 2024
मदर्स डे (सुष्मिता सेन की इंस्टाग्राम स्टोरी (@sushmitasen Instagram))

सुष्मिता सेन : अभिनेत्री सुष्मिता सेनची इन्स्टाग्राम स्टोरीवर आपल्या आई आणि मुलींनबरोबरचे फोटो शेअर करून मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Mothers Day 2024
मदर्स डे (कंगना रनौत की इंस्टाग्राम स्टोरी (@kanganaranaut Instagram))

कंगना राणौत : बॉलीवुड क्वीन कंगना रणौतनं एक खूप खास फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिची आई ही एका छोट्या मुलाला घेऊन आहे.

Mothers Day 2024
मदर्स डे (नीतू कपूर की इंस्टाग्राम स्टोरी (@neetu54 Instagram))

नीतू कपूर : अभिनेत्री नीतू कपूरनं इंस्टाग्राम स्टोरीवर एक जुना फोटो शेअर केला आहे. याशिवाय नीतूनं आपल्या मुलीबरोबरचा फोटो शेअर करून या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Mothers Day 2024
मदर्स डे (टाइगर श्रॉफ की इंस्टाग्राम स्टोरी (@tigerjackieshroff instagram))

टायगर श्रॉफ : टायगर श्रॉफनं इंस्टाग्राम स्टोरीवर आपल्या आईबरोबरचा सुंदर फोटो शेअर करून मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Mothers Day 2024
मदर्स डे (जैकलीन फर्नांडीस की इंस्टाग्राम स्टोरी (@jacquelienefernandez instagram))

जॅकलिन फर्नांडिस :अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनं इन्स्टाग्राम स्टोरी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये काही प्राणी दिसत आहे, जे आपल्या पिल्ल्यांबरोबर आहेत. या व्हिडिओच्या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, "जगातील सर्व आई या सारख्या आहेत." तिची ही पोस्ट खूप आकर्षक आहे.

Mothers Day 2024
मदर्स डे (बिपाशा बसु की इंस्टाग्राम स्टोरी (@bipashabasu instagram))

बिपाशा बसू : बॉलिवूडची हॉट अभिनेत्री बिपाशा बसूनं एक सुंदर व्हिडिओ शेअर करत आईसाठी घेतलेल्या गिफ्टची झलक चाहत्यांना दाखवली आहे. याशिवाय तिनं एक फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती आपल्या आईबरोबर दिसत आहे.

जॅकी भगनानी : अभिनेता जॅकी भगनानीनं सासू आणि आईसाठी एक खास संदेश देत लिहिलं, "आज, माझ्या हृदयात विशेष स्थान असलेल्या अविश्वसनीय महिलांचा सन्मान करण्यासाठी मला थोडा वेळ घ्यायचा आहे. आईसाठी, तुझ्या प्रेमाची सीमा नाही आणि तुझ्या त्यागांनी मला अशा प्रकारे आकार दिला आहे की, मी कधीही हे व्यक्त करू शकत नाही. तुमच्या दयाळूपणानं मला सुरुवातीपासूनच कुटुंबाचा एक प्रिय भाग असल्यासारखे वाटले आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेमाब आणि पाठिंब्याबद्दल मी आजच नव्हे तर दररोज माझ्या जीवनात कृतज्ञ आहे."

हेही वाचा :

आईची भूमिका साकारून 'या' अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर केलं राज्य - mothers day 2024 special

'क्योंकि सास भी कभी बहू थी' फेम 'या' अभिनेत्याची फसवणूक, शेअर गुंतवणुकीच्या बहाण्यानं सव्वा कोटीला गंडा - Actor Amar Upadhyay

जितेंद्र कुमार आणि नीना गुप्ता स्टारर 'पंचायत 3'च्या ट्रेलरची तारीख आली समोर - Jitendra Kumar and neena gupta

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.