ETV Bharat / entertainment

"पाकिस्तानी कलाकार खपवून घेतले जाणार नाहीत" : मनसेचे अरिजीत सिंगला थेट आव्हान - Atif Aslam

MNS aggressive against Pakistani artists : पाकिस्तानी गायक अतिफ असलम बॉलिवूड चित्रपटासाठी अरिजीत सिंगसोबत गाण्याचे रेकॉर्डिंग करणार असल्याचे समजते. त्यामुळे पुन्हा एकदा मनसेची चित्रपट सेना खवळली आहे. मनसेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी अर्जित सिंग यांना थेट आव्हान दिलं आहे.

MNS aggressive against Pakistani artists
मनसेचे अरिजीत सिंगला थेट आव्हान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 5, 2024, 5:31 PM IST

मुंबई - MNS aggressive against Pakistani artists : अनेक संगीत प्रेमींचा आवडता गायक आतिफ असलम पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आगामी 'लव स्टोरी ऑफ 90' या चित्रपटात अर्जित सिंग सोबत अतिफ असलम देखील गाणं म्हणणार असल्याची माहिती आहे. त्यातच भारतात पाकिस्तानी कलाकारांना मागची काही वर्ष घोषित बंदी असताना आतिफ असलम पुन्हा एकदा पदार्पणा करणार असल्याची माहिती मिळताच त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी अर्जित सिंग यांना थेट आव्हान दिलं आहे.


यासदर्भात अमेय खोपकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ते म्हणतात की, "अतिफ असलम या पाकड्या गायकाला बॉलीवूड फिल्ममध्ये गाण्यासाठी इथलेच काही निर्माते पायघड्या घालतायत. विरोध झाला तर फाट्यावर मारण्याची भाषा अरिजीत सिंग करतोय. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या बळावर फुरफुरणाऱ्यांची मस्ती आता उतरवावीच लागेल. पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय हेच दुर्दैव आहे, पण तरीही सांगतोच. पाकिस्तानी कलाकार इथे खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत, हीच मनसेची भूमिका होती, आहे आणि पुढेही राहणार. फक्त बॉलिवूडच नाही तर कोणत्याही भाषेतील चित्रपटात पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच. हे चॅलेंज स्वीकारण्याची हिंमत कुणी करु नये, एवढाच सल्ला आत्ता देतोय."


गायक आतिफ असलमने गायलेली अनेक गाणी आजही प्रसिद्ध आहेत. यातील 'ताजदार ए हरम' हे सुफी संगीतावर आधारित गाणं किंवा 'मीठे घाट का पानी' अशी अनेक गाणी आजही आपल्या देशात आवडीने ऐकली जातात. सलमान खानच्या 'टायगर जिंदा है' या चित्रपटात अतिफ असलमने गायलेले गाणं हे शेवटचं ठरलं. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये प्रचंड तणाव वाढले आणि पाकिस्तानी कलाकारांवर एक प्रकारची अघोषित बंदी घालण्यात आली. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुढाकार होता. मात्र, आता तब्बल सात वर्षानंतर आतिफ असलम पुन्हा एकदा बॉलीवूड चित्रपटात गाणं गाणार असल्याने मनसेकडून त्याचा विरोध करण्यात आला आहे.


मागील वर्षी फवाद खान यांच्या ‘द लीजंड ऑफ मौला जट्ट’ हा पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यासाठी हालचाली सुरु असल्याच्या चर्चा होत्या. त्यावेळी देखील मनसेच्या चित्रपट सेनेने त्याचा विरोध केला होता. त्यावेळी अमेय खोपकर यांनी म्हटलं होत की, "चीड आणणारी गोष्ट म्हणजे भारतीय कंपनी चित्रपट प्रदर्शनासाठी पायघड्या घालतेय. राजसाहेबांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही हा चित्रपट राज्यासह देशभरात कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही. नाही म्हणजे नाहीच. फवाद खानचे जे कुणी देशद्रोही फॅन्स असतील त्यांनी खुशाल पाकिस्तानमध्ये जाऊन सिनेमा बघावा."


दरम्यान, आता गायक आतिफ असलमच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाली असून, भारतातील कोणत्याही भाषेत आतिफ असलमने गाणं गायल्यास त्याचे परिणाम हे वाईटच होतील. असा इशाराच महाराष्ट्र निर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असताना देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याला विरोध केला आहे. त्यामुळे आता कलाकार मंडळी यावर नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

हेही वाचा -

  1. ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा 'शक्ती' बँड काय आहे, जाणून घ्या इतिहास
  2. ए .आर. रहमान यांनी केले ग्रॅमी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन
  3. सारा अली खान आणि करिश्मा कपूर स्टारर 'मर्डर मुबारक'चा टीझर रिलीज, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.